आगामी महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दिवाळी सणाच्या निमित्ताने राजकीय पक्ष दिवाली मिलन कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा करीत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमातील चित्रफित समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे.
advertisement
राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके
चित्रफितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी बसल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर नटरंग चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीवर एक महिला नृत्य करीत आहे. ही महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर राष्ट्रवादीचे विशेष लक्ष
महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहेत. पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड महापालिकांत पक्षाची कामगिरी उंचावण्याचा अजित पवार यांचा मानस आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्त जास्त उमेदवार निवडून आणण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.
