या सगळ्या घडामोडीनंतर आता अजित पवारांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. एका स्थानिक नागरिकाने विमान कोसळल्यानंतरचा थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात थरकाप उडवणारे दृश्य कैद झाले आहेत.
बारामती तालुक्यातील गोजुबावी इथं २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
advertisement
या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
