नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी त्यांच्यावरच अजित पवारांनी मुंबई महापालिकांची पूर्ण जबाबदारी टाकली आहे. मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बैठक घेतली. या बैठकीला झिशान सिद्दीकी आणि सना मलिकही हजर होते. या बैठकीत पुढील रणनीती नेमकी काय असणार यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. नवाब मलिकांना भाजपने विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीने महायुतीसोबत किंवा महायुती शिवाय लढण्याची तयारी ठेवली आहे. मुंबईत किमान 50 जागा लढवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती आहे. तर महायुतीत राहायचं की नाही याचा निर्णय अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
नवाब मलिकांच्या मतदार संघात दादांची पहिली प्रचार
अजित पवारांनी अद्याप मुंबईसाठी स्वबळाचा नारा दिलेला नाही किंवा अद्याप त्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. मुंबईतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला मेळावा नवाब मलिक यांच्या मतदार संघात होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचा विरोध, विरोध करताना नवाब मलिक यांचेच कारण देण्यात आले होते. त्याच नवाब मलिकांच्या मतदार संघात दादांची पहिली प्रचार सभा होणार आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची संयुक्त बैठक
नवाब मलिकांच्या नावामुळे राष्ट्रवादीला डावलत मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मुंबईत 150 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. तसंच लवकर अंतिम जागावाटप जाहीर होणार आहे.
हे ही वाचा :
