TRENDING:

Rain and Flood: सांगली कोल्हापूरच्या पुरस्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव, अलमट्टीबाबत मोठा निर्णय होणार?

Last Updated:

सांगली, कोल्हापुरातील पुरस्थितीवरून आता सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. अलमट्टी धरणातून तात्काळ पाण्याचा विसर्ग केल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणाता राहू शकतो...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर:
News18
News18
advertisement

प्रत्येक पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. अशावेळी जिल्ह्यांतील पंचगंगा, कृष्णा या नद्यांना पूर येतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलणी करून  अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवावा लागतो. अगदी तशाच प्रकारची परिस्थिती यंदा देखील पाहायला मिळत आहे. पुढील काळात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास सांगली आणि कोल्हापूर पुरामुळे वेठीस धरलं जावू शकतं. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग गरजेनुसार नियमित करण्याची गरज आहे. आता सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी आतापासून धावाधाव सुरू केली आहे.

advertisement

सतेज पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला:

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेतली. संबंधित विभागांना पाण्याचे तात्काळ नियमन करावे, अशा सूचना देण्याची मागणी त्यांच्याकडे पाटील यांनी केली. यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी:

advertisement

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्याकडे केली.

advertisement

खासदार विशाल पाटील आक्रमक:

या संभाव्य पूरस्थितीवर बोलताना विशाल पाटील म्हणाले की, "बिहारला पुरस्थिती नियंत्रणासाठी बक्कळ निधी दिला जातो. तसा महाराष्ट्राला का मिळत नाही? अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारने तात्काळ लक्ष घालून योग्य उपाययोजन कराव्यात" अशी मागणी खासदार विशाल पाटलांनी केली. काँग्रेसचे आमदार विशाल पाटील देखील संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

advertisement

पुण्यात महापूर; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, सिंहगडरोडवरील ग्राऊंड स्थिती दाखवणारा VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सर्व नेतेमंडळी संभाव्य पुरस्थितीवरून सतर्क झाल्याने कर्नाटक सरकारने सहकार्य केल्यास यंदा पुरस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rain and Flood: सांगली कोल्हापूरच्या पुरस्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव, अलमट्टीबाबत मोठा निर्णय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल