नेमकी घटना काय?
शनिवारी संध्याकाळी आलोक सिंग लोकलने प्रवास करत असताना आरोपी ओमकार शिंदे (२७) याच्याशी त्यांचे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरण्यावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात ओमकारने आपल्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने आलोक यांच्यावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की आलोक सिंग यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागलं. रक्तस्त्राव अधिक झाल्याने आलोक यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
वाढदिवसाचा आनंद दु:खात विरला
महत्त्वाचं म्हणजे घटनेच्या दिवशी शनिवारी आलोक यांची पत्नी पूजा यांचा वाढदिवस होता. संध्याकाळी पत्नीला घेऊन डिनरला जाण्याचा प्लॅनही आलोक यांनी आखला होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरी आनंदाचे वातावरण असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली. पूजा सध्या बीएड करत असून, हे दाम्पत्य स्वत:चं घर घेण्यासाठी पैसे साठवत होतं. पण या एका घटनेनं त्यांचा संसार आणि सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत.
या अत्यंत गर्दी असेलल्या स्थानकात ही घटना घडल्याने रेल्वे पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान होते. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील 'फेशियल रेकग्निशन' च्या मदतीने पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपी ओमकार शिंदेचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
आलोक सिंग यांचे कुटुंब सुशिक्षित असून त्यांचे अनेक नातेवाईक शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अनिल कुमार हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा दलात कार्यरत आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच ते रविवारी मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला पत्नी पूजाला केवळ अपघाताची माहिती देऊन धीर देण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतर पतीच्या निधनाची बातमी कळताच तिच्यावर आभाळ कोसळलं.
