जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावाजवळील लक्ष्मीनगर तांड्यात राहणारे स्वप्नील राठोड पारंपरिक शेती करायचे. परंतु, नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव अन् विविध संकटे यामुळे ते अंजिर शेतीकडे वळले. खुलताबाद येथून जम्बो जातीचे 200 अंजीर रोपे त्यांनी 2021 मध्ये मागवली. या रोपांची 14 बाय 15 अंतरावर लागवड केली. अवघ्या 18 महिन्यात त्यांना उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला कमी उत्पादन मिळायचे. परंतु, आता झाडे मोठी झालीत त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झाली आहे.
advertisement
शेतकाऱ्यांनो करडईची अश्या पद्धतीने करा लागवड होईल दुप्पट कमाई! महत्वाच्या टिप्सचा Video
30 गुंठे शेतात त्यांना 3 टन उत्पादन मिळते. बाजारात 100 रुपये किलो असा दर मिळतो. याचे 3 लाख रुपये होतात. या पिकाला फारसा खर्च करावा लागत नाही. घरी असलेल्या जनावरांचे शेणखत, पाणी आणि काही प्रमाणात फवारणी केली की हे पीक चांगले येते. शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले तर चांगली कमाई होऊ शकते, असं स्वप्नील कोठेच यांनी सांगितलं.





