सोलापूर : मधल्या काळामध्ये करडईचं क्षेत्रफळ कमी झालं होतं. पण आता बाजारात करडईच्या किमती वाढल्या असून क्षेत्रफळसुद्धा वाढत आहे. सर्वात जास्त करडईची लागवड दक्षिण सोलापूर तालुक्यात केली आहे. करडईची लागवड केल्यावर हार्वेस्टिंग करताना शेतकऱ्यांना त्रास होत होता, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीतून हार्वेस्टिंग सोपे झाले असून कमी खर्चात जास्त उत्पादन शेतकरी करडईच्या लागवडीतून घेत असताना दिसत आहे. या संदर्भात अधिक माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सोलापूर विभागात कार्यरत असलेल्या अर्चना पवार यांनी दिली.



