तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाला तसेच हात गाडी चालकाला धडक बसली. कारच्या धडकेने चौघे जण रस्त्याच्या बाजूला पडले. त्यावर उपस्थित नागरिकांनी संतापून तरुणीच्या कारची तोडफोड केली.
महिलांकडून युवतीला चोप
अपघातानंतर संतप्त जमावाने दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी कारचे दरवाजे आणि काचा फोडल्या. या अपघातात दोन दुचाकीचे नुकसान झाले तर कार चालक युवतीला काही महिलांनी मारहाण केली. या अपघातात चार लोक जखमी झाले आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन चारचाकी वाहनासह चालक युवतीला ताब्यात घेतले.
advertisement
कार चालवणाऱ्या तरुणीने मध्यप्राशन केल्याचे समोर
अपघात झाल्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार आणि कार चालक युवतीला ताब्यात घेतले. कार चालक युवतीच्या वैद्यकीय अहवालातून तिने मद्य प्राशन केल्याचे समोर आले आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
November 20, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरीने दारू ढोसली, चार जणांना जबर धडक, अमरावती अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर
