दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गद्दार असेल तर भाजप महागद्दार आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत जानकर यांचा उल्लेख लहान भाऊ केला. भाजपच्याच पाठिंब्यावर त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
advertisement
आता जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला मतदान करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. ते अमरावती येथे आयोजित केलेल्या ‘वाडा' आंदोलनात बोलत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी ‘वाडा आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.
यावेळी महादेव जानकर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेला काय झालं? मी आणि बच्चू कडू स्वतंत्र लढलो. त्या बच्चू कडूलाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. मी जर खासदार झालो असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते. शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांना माझी विनंती आहे की, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहेच, पण भाजप महागद्दार आहे, असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलाय. अमरावतीत बच्चू कडूच्या आंदोलनादरम्यान त्यांनी ही टीका केलीय. अमरावतीत बच्चू कडू यांच्या मोर्चाला जानकर यांची उपस्थिती होती
