मयूर देशमुख हे अमरावती जिल्ह्यातील काजळी या गावातील एक प्रगतशील शेतकरी आहे. ते शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात. त्यामुळे त्यांना शेतीमध सर्वच पिकांचा चांगला अनुभव आहे. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतात. तूर पिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, यावर्षी पाऊस भरपूर झालाय. त्यामुळे कपाशी, सोयाबीन आणि इतर पिकाबरोबरच तूर पीक देखील धोक्यात आहे. तुरीमध्ये दोन रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. एक म्हणजे फायटोप्थरा आणि दुसरा म्हणजे वांझ. या रोगांसाठी अनेकजण फवारणी करतात. पण, फवारणीमुळे ते रोग कमी होत नाही.
advertisement
कोणत्या उपाययोजना कराव्यात?
यासाठी क्रोलोवायलिफास किंवा रेडोनील याची फवारणी घ्यावी. जेणेकरून फायटोप्थराला आळा घालता येईल. तसेच बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ड्रिंचींग करणे आवश्यक आहे. यावर्षी जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. सध्या आपल्याला तूर पिकात काही समस्या जाणवणार नाही. मात्र, फळधारणा होताना अनेक रोग दिसून येतील. त्यामुळे ड्रिंचींग महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही सुडोमोनो आणि ड्रायकोडर्मा वापरू शकता. याच ड्रिंचींग करण्याच्या आधी त्यात गूळ आणि बेसन टाकणे गरजेचे आहे. हे द्रावण 72 तास सेट होऊ द्यायचं आहे. त्यांनतर जर तुम्ही ड्रिंचींग केलं तर याचे चांगले रिझल्ट दिसून येतील, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते सांगतात की, ही प्रक्रिया किचकट वाटत असल्यास तुम्ही रेडोमिल + एप्टारा याच ड्रिंचींग घेऊ शकता. याचेही रिझल्ट चांगले मिळतील. पुढे तुरीवर मर, वांझ यासारखे रोग येणार नाही. तसेच उत्पादनातही वाढ होऊ शकते. यावर्षी आधीच खूप पाऊस झालाय. पुढेही पाऊस हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.