मुंबईत 2008 साली अटक
पोलिसांनी गवळीला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी कारागृहाच्या मागच्या गेटमधून बाहेर काढले. त्यामुळे त्याची सुटका अत्यंत गोपनीय पद्धतीने झाली. अरुण गवळीला मुंबईत 2008 साली अटक करण्यात आली होती आणि 2009 पासून त्याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण
advertisement
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2007 मध्ये हत्या झाली होती. या खटल्यात गवळीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तेव्हापासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदी होता. दरम्यान दीर्घ तुरुंगवास आणि वाढते वय लक्षात घेता गवळीने न्यायालयाकडे विनंती अर्ज करीत जामीन मागितला होता.
दरम्यान, अरुण गवळीला न्या. एम एम सुंदरेश आणि न्या. एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीने 17 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याची नोंद घेतली. त्याचे वय 76 वर्षे झाल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. अरुण गवळी 2004 ते 2008 मध्ये आमदार होता. त्यामुळे आता अरुण गवळी पुन्हा राजकीय पाढा वाचणार का? असा सवाल विचारला जात आहे.