शंतनू ऊर्फ बापू कांबळे असं हल्ला ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो भाजपच्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे बंधू आहेत. घटनेच्या दिवशी शंतनू हा आपल्या नगरसेविका बहिणीचा फलक लावत होते. याच कारणातून त्यांना १४ ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पुण्याच्या कासेवाडी परिसरात घडली आहे.
नेमकी घटना काय?
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत कासेवाडी-भवानी पेठ प्रभागातून भाजपच्या उमेदवार मृणाल कांबळे निवडून आल्या होत्या. विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी कांबळे यांचे कार्यकर्ते कासेवाडी भागात फलक लावत होते. त्यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. त्यांनी शंतनू कांबळे यांना या भागात फलक लावू नका असे सांगितले. यानंतर टोळक्याने शंतनू कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले.
१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी शंतनू कांबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तब्बल १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्थानिक गुंडांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या भावावरच अशा प्रकारे भरचौकात हल्ला झाल्याने पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
