याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्राणगी विकी भोईर (वय 4 वर्षे) आणि बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (वय 23 वर्षे) अशी मृत्यू झालेल्य दोघींची नावं आहे. प्राणगी ही मूळची आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये राहत होती. शनिवार-रविवारी शाळेला सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यासाठी आली होती. प्राणगी आणि तिची मावशी गाढ झोपेत असताना विषारी सापाने दोघींना चावा घेतला.
advertisement
विष भिनलेल्या प्राणगीचा दवाखान्यात नेण्यापूर्वी मृत्यू झाला होता. तर मावशी बबली उर्फ श्रुती हिला आधी केडीएमसीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथे तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवंण्यात आलं होतं. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचार घेत असताना तिचाही मृत्यू झाला.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात दोघींना योग्य ते उपचार मिळाले नाहीत. ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिल नाही, असे आरोप मुलीचे काका आणि आजोबांनी केले आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.