देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे 'सामना'च्या अग्रलेखातून कौतूक करण्यात आले. 'नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले. यावरतीच बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून प्रेमभंग झाला तर नवीन प्रेमी असावा म्हणून भाजपसोबत शिवसेनेचे हे नवीन प्रेम प्रकरण असू शकतो, अशी फटकेबाजी बच्चू कडू यांनी केली.
advertisement
दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा अध्यक्ष असूनही त्यांना न्याय देऊ शकलो नाही
दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच अमरावतीत आले होते. दिव्यांगांना वेळेवर मानधन मिळत नसल्याचे सांगत दिव्यांगांसोबत बेईमानी करू शकत नाही. कारण मी अध्यक्ष राहून सुद्धा त्यांना न्याय देऊ शकलो नाही. म्हणून राजीनामा देत असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
बीडची गुंडागर्दी पूर्णपणे नाहीशी करावी, राज्याचे नाव बदनाम होतेय
बीड हा विषय राज्याचा विषय झाला असून यामुळे राज्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि बीडची गुंडागर्दी पूर्णपणे नाहीशी करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी दिली.
मोठा मासा लहान माशाला गिळतो, तसा भाजप पक्ष आहे
लाडकी बहिण योजना लागू केली,मात्र आता निकष पाहिले जात आहे. खरे तर लाडकी बहीण म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे. राज्यात आणि देशात हिंदूंचे सरकार आहे. मात्र तरीही हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहे. मोठा मासा लहान माशाला गिळतो, तसा भाजप पक्ष आहे. निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वात घेतल्या मात्र, नंतर त्यांनाच बाजूला केले, अशी टीका कडू यांनी भाजपच्या राजकारणावर केली.
