TRENDING:

बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरण,नादाला लावणारी नर्तिका वेश्याव्यवसायात? पोलिसांच्या धाडीत नवा ट्विस्ट

Last Updated:

पार्ट्या भरवून नर्तिका डान्स करून लोकांना खूश करायच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर :  कला केंद्रावर जाऊन बीड येथील माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांनी आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि नर्तिकेच्या नादापायी आत्महत्या केली. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता त्याच कला केंद्राविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्चला कला केंद्रावर छापा टाकून 25 तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तिकेचा देखील या सेक्स रॅकेटमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तिकेला अटक केली असून ती सध्या कोठडीत आहे. . गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना कबुली दिली. मात्र ती नर्तिका मोडनिंब येथील कला केंद्रात वेश्याव्यवसायात अडकलेली आढळल्याचे समोर आले आहे.

advertisement

कला केंद्राच्या नावाखाली काळे धंदे

समोर आलेल्या माहितीनुसार, कला केंद्र असे फक्त नाव होते मात्र येथे काळे धंदे सुरू असल्याचे समोर आले आहे. इथं अनेक हौशे आणि धनदाड्यांची गर्दी असते. इथं पार्ट्या भरवून नर्तिका डान्स करून लोकांना खूश करायच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते. कित्येक महिन्यांपासून हे काळे धंदे राजरोस सुरू होते. महत्त्वाचे म्हणजे हे कला केंद्र पोलीस स्थानकापासून जवळच होते, तरी सुद्धा पोलिसांना याची कुणकुण लागली नाही,

advertisement

हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं आयोजन

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पीडित तरुणींना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. त्यांना नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसमोर उभे करून अनैतिक कामे करायला भाग पाडले जात होते. एवढंच नाहीतर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं इथं आयोजन होत होतं. उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आधीच खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आढळल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

advertisement

आणखी  धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?
सर्व पहा

पोलिसांनी सांगितले की, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरण,नादाला लावणारी नर्तिका वेश्याव्यवसायात? पोलिसांच्या धाडीत नवा ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल