advertisement

Success Story : शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?

Last Updated:

शेतीची आवड असल्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याने अर्ध्या एकरात भोपळ्याची लागवड करून अवघ्या 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

+
News18

News18

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब गावातील अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या नंदकिशोर सुर्वे या तरुणाने शेतीतून उल्लेखनीय यश मिळवले आहे. शेतीची आवड असल्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याने अर्ध्या एकरात भोपळ्याची लागवड करून अवघ्या 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे
नंदकिशोर सुर्वे सध्या अकरावीचे शिक्षण घेत आहे. शेतीबद्दल असलेल्या आवडीमुळे त्याने अर्ध्या एकर क्षेत्रात वरुण कंपनीच्या भोपळ्याची लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून रान भुसभुशीत करण्यात आले. त्यानंतर जमिनीत शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. याच शेतात यापूर्वी त्याने टोमॅटोचे पीक घेतले होते. त्या बेडवर दुसरे पीक म्हणून भोपळ्याची लागवड करण्यात आली.
advertisement
भोपळ्याच्या पिकावर भुरी, केवडा आणि फळकुज यांसारखे रोग होऊ नयेत म्हणून वेळोवेळी फवारणी करण्यात आली. अर्ध्या एकरातील या लागवडीसाठी नंदकिशोर याला सुमारे 30 हजार रुपयांचा खर्च आला. मात्र योग्य नियोजन, मेहनत आणि काळजीपूर्वक व्यवस्थापनामुळे अवघ्या 90 दिवसांत खर्च वजा करून त्याला सुमारे दीड लाख रुपयांचा नफा मिळवला.
advertisement
नंदकिशोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कॉलेजला जातो. उर्वरित वेळेत तो शेतीची कामे करतो. त्याने पिकवलेला भोपळा सोलापूर बाजारात न विकता पुणे येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. सध्या भोपळ्याला 15 ते 30 रुपये किलो दर मिळत असून इतर वेळी 8 ते 10 रुपये दर मिळतो.
नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शिक्षण घेत असतानाच शेती किंवा व्यवसायाकडे तरुणांनी वळले, तर नोकरीपेक्षाही अधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते, असा सल्ला तरुण शेतकरी नंदकिशोर सुर्वे याने दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement