TRENDING:

 'चटणीफेक' गँगचा गेम ओव्हर! सोनाराच्या डोळ्यात चटणी फेकून लूट करणाऱ्यांचा बीड पोलिसांनी उतरवला माज

Last Updated:

सोन्याच्या दागिन्यांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड :  बीड जिल्ह्यात सोनाराच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून लूट करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

ही धक्कादायक घटना 21 फेब्रुवारी रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. एका सोनाराने आपल्या दुचाकीवरून सोने विक्रीसाठी जुन्या दिघोळअंबा रोडने प्रवास सुरू केला असताना होळ ते दिघोळअंबा दरम्यान दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. अचानकपणे सोनाराच्या डोळ्यात तिखट चटणी फेकून त्यांना अंधुक दिसू लागेल अशी परिस्थिती निर्माण करत आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.

advertisement

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक

या घटनेनंतर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेत परिसरातील तब्बल 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त

advertisement

रोहित रणजित धिमिधिमे (अंबाजोगाई), अभिषेक अशोक घाटुळ (परळी), कानिफनाथ विलास बुरकर (अंबाजोगाई), यशोदीप कल्याण किसान (अंबाजोगाई), सुदाम मारुती सोनवणे (डिघोळअंबा) आणि वीरसिंग ऊर्फ रणजितसिंग टाक (अंबाजोगाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून लुटलेले सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
 'चटणीफेक' गँगचा गेम ओव्हर! सोनाराच्या डोळ्यात चटणी फेकून लूट करणाऱ्यांचा बीड पोलिसांनी उतरवला माज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल