दोन माओवाद्यांचे मृतदेह आढळले असून घटनास्थळी एस एल आर या अत्याधुनिक बंदुकीसह काही शस्त्रसाठा ही आढळला आहे. अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याआधी माओवादी संघटनेचे प्रमुख, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य देवजी उर्फ टिपिरी तिरुपती आणि त्यांचे सहकारी केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजू रेड्डी यांनी १६ माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं.
advertisement
पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. देवजी हा माओवादी संघटनेचे प्रमुख आहे आणि बसवराजू यांच्यानंतर त्यांची निवड झाली होती. सुरक्षा दल देवजीचा शोध घेत असताना, न्यूज18 ला उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की माओवादी संघटनेचे प्रमुख असलेले देवजी याने त्यांच्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. गडचिरोली जिल्ह्यात, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे १९९१ मध्ये देवजी यांच्या नेतृत्वाखालील माओवाद्यांनी अपहरण केले होते.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ७६ सीआरपीएफ सैनिकांच्या हत्येमागील सूत्रधार देवजी होता. देवजी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सैनिकांवर विविध हल्ले झाले आहेत, ज्यामुळे शेकडो लोक शहीद झाले आहेत. या हल्ल्यासाठी सर्व राज्यांमध्ये दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस जाहीर केलं जात आहे. पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल.
