तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी भाजप प्रचार कार्यालयात एक तासाहून अधिक काळ जोरदार राडा घातला आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवार दिव्या मराठे यांना तर थेट अश्रू अनावर झाले. मागील वेळी एबी फॉर्म पळवला आणि आता उमेदवारी नाकारली. आमचं काय चुकलं? असा प्रश्न करत दिव्या मराठे धाय मोकलून रडल्या. त्यांनी भाजप कार्यालयात आपल्या समर्थकांसह राडा घातला.
advertisement
यावेळी इतरही अनेक उमेदवार आक्रमक पवित्र्यात उतरले. तिकीट नाकारल्याच्या कारणातून काहींनी पेट्रोलच्या बाटल्याही सोबत आणल्या होत्या. उमेदवारी कापल्याने भाजप कार्यालय पेटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी पेट्रोलच्या बाटल्या सोबत आणणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, भुरळ येईपर्यंत महिलेला अश्रू अनावर झाले. जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ भाजप कार्यालयात हा जोरदार राडा झाला. अनियंत्रित झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला. सध्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही हिंसक प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.
