TRENDING:

फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत आली अपडेट

Last Updated:

आमदार किशोर जोरगेवार यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रपूर :  चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आज सकाळपासून अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर तातडीने त्यांना चंद्रपूरच्या सीएचएल हार्ट स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
News18
News18
advertisement

रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची सखोल तपासणी केली. तपासणीत हृदयाशी संबंधित अडचण लक्षात आल्यानंतर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये रक्तवाहिनीत अडथळा आढळून आल्याने डॉक्टरांनी त्वरित अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. सुमारे काही तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर आमदार जोरगेवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

advertisement

मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन

आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची माहिती घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांबाबत माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीही रुग्णालयात भेट देऊन आमदारांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी

दरम्यान, आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली. रुग्णालय परिसरात एकच गडबड उडाली होती. मात्र, रुग्णालयातील उपचारांमध्ये अडथळा येऊ नये, तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन कुटुंबीयांनी आणि रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

advertisement

लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

चंद्रपूर मतदारसंघातील नागरिकांमध्ये आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, पुढील  24 ते  48  तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत आली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल