आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 682 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 489 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2750 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 22 क्विंटल आल्यास 6300 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रावर येतंय संकट, शुक्रवारी उन्हाचा तडाखा बसणार, हवामान खात्याकडून अलर्ट
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 581 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 563 क्विंटल द्राक्षास 4000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 17 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 3500 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 275 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 261 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 19000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल डाळिंबास 11500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





