Weather Alert : महाराष्ट्रावर येतंय संकट, शुक्रवारी उन्हाचा तडाखा बसणार, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 30 ते 36 अंश सेल्सियस दरम्यान राहील, तर किमान तापमान 18 ते 24 अंशांपर्यंत असेल. पावसाची शक्यता नगण्य असून, आकाश मुख्यतः निरभ्र किंवा हलक्या ढगाळ राहील. दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल.
advertisement
कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 30-32 अंश सेल्सियस, तर किमान 22-24 अंश असेल राहील. आर्द्रता जास्त असल्याने अस्वस्थता जाणवेल. रत्नागिरी, अलिबाग परिसरातही 31-33 अंश कमाल तापमान अपेक्षित आहे. पाऊस किंवा ढगाळपणा नसून, सूर्यप्रकाश प्रखर राहील. समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










