चित्रपट नाहीत, नाटक नाही; अनेक महिने डिप्रेशनमध्ये होता मराठी अभिनेता, पोस्ट व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता प्रियदर्शन जाधव गेली अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होता.यावर त्याने कशी मात केली हे त्याने पोस्ट लिहित सांगितलं.
प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणून गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करणारा, नाव कमावणाऱ्या प्रियदर्शन जाधवने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. प्रियदर्शनची पोस्ट वाचून अनेक जण शॉक झालेत. कलाकारांचं पडद्यावर दिसणारं आयुष्य आणि पडद्यामागचं आयुष्य किती वेगळं असतं. त्यांना किती गोष्टींना समोरं जावं लागतं हे यातून पाहायला मिळालं. प्रियदर्शन जाधव गेली अनेक महिने डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं. या काळात तो कोणत्या गोष्टींना सामोरं जात होता, त्यातून तो कसा बाहेर आला हे देखील सांगितलं.
प्रियदर्शनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून मी प्रचंड तणाव, चिंता आणि थोड्याफार नैराश्यपूर्ण मनःस्थितीतून जात आहे. कामाबद्दल पूर्णपणे थकल्यासारखं वाटत होतं. नवीन चित्रपट नाहीत, नाटक नाही, टेलिव्हिजनवर काही नाही. नाटक लिहिता येत नव्हतं, चित्रपट लिहिता येत नव्हता. एकाग्रतेचा अभाव, कामांचे प्रोजेक्ट्स आणि रिलीज लांबणीवर पडले. लोकांपासून दूर पळावंसं वाटणं… वैयक्तिक आयुष्यात कधी खूप आनंदी, तर कधी अत्यंत असुरक्षित वाटणं. चटकन राग येणं, उद्देश नसलेले दिवस, अधूनमधून झोप न लागणं."
advertisement
"या सगळ्या गोंधळात अमेरिका दौरा माझ्यासाठी आशीर्वाद ठरला. हा फोटो लास वेगासमध्ये काढलेला आहे. कॅसिनोमध्ये मी पूर्ण रात्र जागाच होतो, नशीब आजमावत होतो आणि आश्चर्य म्हणजे मी 203 डॉलर्स जिंकलो. ते पैसे घेतले आणि आम्ही सगळे मिळून अॅरिझोनातील ग्रँड कॅनियनला गेलो. तिथे खूप छान वेळ घालवला."
advertisement
advertisement
प्रियदर्शननने पुढे लिहिलंय, "कधी कधी अशा वादळी काळात हास्य अशक्य वाटणारंही शक्य करून दाखवतं.
प्रेम तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतं.वाईट नशीब आवाज करतं, पण शहाणपणाला कधी शांतपणे मागे हटायचं हे ठाऊक असतं, मला आशा आहे, सगळं काही ठीक होईल."
प्रियदर्शन जाधव काही महिन्यांआधी चला हवा येऊच्या नव्या सीझनमध्ये काम करत होता. या सीझनमध्ये लेखक, दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत होता. त्याने अभिनयाची जबाबादारी देखील पार पाडली होती. पण हा सीझन काही महिन्यातंच संपला. त्यानंतर प्रियदर्शन जाधव नव्या कोणत्या कलाकृतीत दिसला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
चित्रपट नाहीत, नाटक नाही; अनेक महिने डिप्रेशनमध्ये होता मराठी अभिनेता, पोस्ट व्हायरल










