advertisement

LTT च्या सहकाऱ्यांकडून प्रशिक्षण, जंगलातलं अधिवेशन ते नक्षली कारवाया, भूपतीची खळबळजनक मुलाखत

Last Updated:

दीडशे जिल्ह्यात हिंसक चळवळ चालवणाऱ्या माओवादी संघटनेचा प्रवास कसा होता, हे आत्मसमर्पण केलेल्या भूपतीने सांगितले.

भूपती
भूपती
महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली : माओवादी संघटनेचे प्रमुख असलेले बसवराजू जिवंत असतानाच शस्त्र सोडण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती माओवादी संघटनेच्या वैचारिक मेंदू समजला जाणारा त्यांच्या संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेला आत्मसमर्पित माओवादी मल्लू जिल्हा बेडूगोपाल उर्फ भूपती याने दिली आहे. 1980 पासून 2025 ऑक्टोबर पर्यंत मावादी संघटनेत मुख्य भूमिकेत असलेल्या वेणूगोपाल यांनी 60 सहकाऱ्यांसह गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले होते.
न्यूज एटीन मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत देशातल्या दीडशे जिल्ह्यात हिंसक चळवळ चालवणाऱ्या माओवादी संघटनेचा प्रवास कसा होता, या संघटनेला सुरक्षा दलांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी भू सुरंग स्फोटकं आणि इतर लढण्याचं तंत्र एलटीटीमधून बाहेर पडलेल्या काही सहकाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण दिल्यामुळेच सुरक्षा दलाच्या विरोधात सशस्त्र लढयाला कसं यश आलं? याची माहितीही वेणुगोपाल उर्फ भूपतीने दिली आहे.
advertisement

...तर तो आज जिवंत राहिला असता

गेल्याच वर्षी माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता भाकप माओवादी संघटनेचा महासचिव बसवराजू याच्या संमतीनेच संघटनेने शस्त्रे सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा निर्णय अमलात येण्यापूर्वीच बसवराज चकमकीत ठार झाला. हिडमा माझा हा आवडता सहकारी होता. आत्मसमर्पण केलं असतं तर तो आज जिवंत राहिला असता, अशी हळहळ व्यक्त करत माओवादी संघटना अनेक विषयात चुकीच्या पद्धतीने वागल्यानेच संघटनेला हादरा बसला, अशी कबुलीही भूपतीने दिली.
advertisement

माओवाद्यांच्या सर्वोच्च मार्गदर्शकासोबत शेवटची बैठक कधी?

तब्बल 40 वर्षे कुटुंबीयापासून दूर राहिलो असून जंगलातल्या आदिवासींनी माझ्यावर प्रेम केले. त्यामुळे आदिवासी भाग हा माझा आवडता क्षेत्र आहे. असे सांगत शस्त्र सोडून मूळ प्रवाहात परत येण्याची वाटचाल भूपतीने न्यूज 18 मराठीशी बोलताना उलगडून दाखवली. माओवाद्यांचा सर्वोच्च मार्गदर्शक नेता गणपती याच्यासोबत 2024 मध्ये शेवटची भेट झाल्याचे सांगत केंद्र समितीच्या काही सदस्यांसोबतची ती शेवटची बैठक होती, अशी माहितीही भूपतीने दिली.
advertisement

माओवाद्यांचं सगळ्यात मोठं अधिवेशन जंगलात कसं पार पडलं?

गडचिरोली जिल्ह्यात 1980 च्या काळात वनविभागाने मोठ्या प्रमाणात आदिवासींवर अत्याचार केले. त्यामुळेच अनेकांनी संघटनेत प्रवेश केला आणि आमची संघटना या भागात वाढली, असे सांगत 1984 मध्ये देशातलं माओवाद्यांचं सगळ्यात मोठं अधिवेशन कसं पार पडलं याची माहितीही भूपतीने दिली. पश्चिम बंगालच्या चकमकीत ठार झालेला मोठा भाऊ किशनजी सुरुवातीपासूनच त्यांच्या संघटनेचे नेतृत्व करत असल्याने त्याच्या मार्गदर्शनातच माओवादी संघटनेची वाट धरली असेही भूपतीने सांगितले.
advertisement

जिवंत राहायचे असेल तर आत्मसमर्पण करा, सहकाऱ्यांना आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत नक्कीच माओवादी संघटना संपुष्टात येण्याची शक्यता दिसत असल्याचाही भूपतीने मान्य केले. जिवंत राहण्यासाठी शस्त्र सोडणे आवश्यक असून संघटनेत सक्रीय असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहनही भूपतीने केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
LTT च्या सहकाऱ्यांकडून प्रशिक्षण, जंगलातलं अधिवेशन ते नक्षली कारवाया, भूपतीची खळबळजनक मुलाखत
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement