Diet Tips : वजन कमी करण्यासाठी 1:5:1 फॉर्म्युला, पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा वेट लॉस पॅटर्न
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वजन कमी करण्यासाठी घाम गाळावा लागतो, आहारात बदल करावे लागतात पण त्याचं टेन्शन न घेताही वजन कमी करता येणं शक्य आहे. यासाठीचा 1:5:1 पॅटर्न सध्या चर्चेत आहे.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी, एका नवीन नियमाविषयी माहिती करुन घेऊयात. या नवीन नियमानं तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी घाम गाळावा लागतो, आहारात बदल करावे लागतात पण त्याचं टेन्शन न घेताही वजन कमी करता येणं शक्य आहे. यासाठीचा 1:5:1 पॅटर्न सध्या चर्चेत आहे.
1:5:1 नियम - हा नियम म्हणजे, वजन कमी करण्यासाठीचा एक पॅटर्न आहे. यात क्रॅश डाएट नाही पण खाण्याबद्दलची एक टिप आहे. जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. यात एक तास व्यायामासाठीचा आहे. दिवसातून किमान एक तास शारीरिक हालचाल. दिवसभरात पाच वेळा आकारानं लहान आणि पौष्टिक अन्न खावं. तसंच प्रत्येक वीस किलोग्रॅम वजनासाठी किमान एक लीटर पाणी प्या असा हा नियम आहे.
advertisement
या नियमात, अन्नात फायबर, प्रथिनं आणि कर्बोदकांचं योग्य संयोजन ठेवावं लागेल. कार्बोहायड्रेट्सची निवड करण्यासाठी, तुम्हाला 1:5:1 नियमाचं पालन करावं लागेल. एक ग्रॅम साखर खाल्ली तर तुम्ही ते पाच ग्रॅम फायबर आणि एक ग्रॅम प्रथिनं खाल्ली पाहिजेत. पाच ग्रॅम फायबरमुळे पचनक्रिया मंदावते, आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि जास्त काळ पोट भरलेलं राहतं.
advertisement
प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा - आहारातून पांढरा ब्रेड आणि प्रोसेस्ड पदार्थ काढून टाका, कारण त्यामुळे वजन वाढतं.
फायबर - वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. हे साध्य करण्यासाठी, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. आहारात ओट्स, ब्राऊन राईस, बार्ली, डाळी, राजमा आणि भाज्यांचा समावेश करा.
advertisement
प्रथिनं - वजन कमी करण्यात प्रथिनं देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडी, चिकन ब्रेस्ट, मासे, कॉटेज चीज, ग्रीक योगर्ट, डाळी, सोयाबीन, टोफू, नट्स यांचा आहारात समावेश करता येईल.
कर्बोदकं - वजन कमी करण्यासाठी, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स निवडा, ज्यामधे भरपूर फायबर असतं. आणि ते हळूहळू पचतात. ओट्स, ब्राऊन राईस, क्विनोआ, रताळं आणि डाळी हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करता येतील.
advertisement
वजन कमी करण्यासाठी आहारात खूप मोठे बदल करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 7:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet Tips : वजन कमी करण्यासाठी 1:5:1 फॉर्म्युला, पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा वेट लॉस पॅटर्न










