advertisement

Hygiene Tips : रात्री झोपताना पाय का धुवायचे ? पायांची निगा राखण्यासाठी स्किन हायजीन टिप्स, जाणून घेऊया पाय धुण्यामागची वैज्ञानिक कारणं

Last Updated:

झोपण्यापूर्वी चेहरा आणि हात धुता त्याचप्रमाणे पायांचीही स्वच्छता राखणं आवश्यक आहे. घरातील आणि बाहेरील घाण, जंतू आणि लहान धूळ कण पायांवर सहजपणे जातात. बूट किंवा चपलांमुळे, पायाला घाम येतो, ज्यामुळे जीवाणू जमा होतात. झोपण्यापूर्वी पाय धुतले नाहीत तर या सर्व घटकांचा अनेक प्रकारे प्रकृतीवर परिणाम जाणवतो.

News18
News18
मुंबई : आपल्या शरीराचा डोलारा दिवसभर पेलून पाय थकतात. सक्रिय राहण्यासाठी पाय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. या पायांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
आपल्या पायांमधे, 26 हाडं, 33 सांधे आणि शंभरहून अधिक स्नायू आणि स्नायूबंध ​​असतात. शरीराच्या इतर कोणत्याही भागाइतकीच तुमच्या पायांची काळजी घेणं आवश्यक आहे.
बरेच जण, चेहरा आणि हातांकडे जितकं लक्ष देतात तितकं पायांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. लोक त्यांचे पाय न धुता झोपतात.
advertisement
झोपण्यापूर्वी पाय धुतले नाहीत तर अंथरुण जंतूंचं प्रजनन केंद्र बनतं. ज्याप्रमाणे झोपण्यापूर्वी चेहरा आणि हात धुता त्याचप्रमाणे पायांचीही स्वच्छता राखणं आवश्यक आहे. घरातील आणि बाहेरील घाण, जंतू आणि लहान धूळ कण पायांवर सहजपणे जातात. बूट किंवा चपलांमुळे, पायाला घाम येतो, ज्यामुळे जीवाणू जमा होतात. झोपण्यापूर्वी पाय धुतले नाहीत तर या सर्व घटकांचा अनेक प्रकारे प्रकृतीवर परिणाम जाणवतो.
advertisement
अस्वच्छ पायामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. यामुळे पायांवर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. खाज सुटणं, लालसरपणा, पाय सोलले जाणं, त्वचा फुटणं, फोड येणं आणि त्वचेवर जळजळ होणं अशा तक्रारी वाढतात.ही लक्षणे विशेषतः खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये सामान्य आहेत जे दीर्घकाळ शूज घालतात.
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग पसरण्याचा धोका देखील असतो. पायांना भेगा पडणं सामान्य असलं तरी, उपचार केले नाहीत तर खूप वेदना होऊ शकतात. कधीकधी संसर्ग वाढल्यानं शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते.
advertisement
पाय मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, बाहेरून आल्यानंतर लगेचच ते पूर्ण धुवा. पायांची काळजी घ्या आणि दिवसातून कमीत कमी दोनदा ते स्वच्छ करा. झोपण्यापूर्वी पाय धुवायला विसरू नका.
आठवड्यातून कमीत कमी दोनदा कोमट पाण्यात पाय भिजवा. यामुळे तुमचे सांधे आणि स्नायूंना आराम मिळेल आणि ते मऊ राहतील. यामुळे तुम्हाला शांत झोपही येईल. मधुमेहींनी त्यांच्या पायांची विशेष काळजी घ्यावी कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. मधुमेहींना संसर्ग किंवा जखम झाली तर ती बरी होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hygiene Tips : रात्री झोपताना पाय का धुवायचे ? पायांची निगा राखण्यासाठी स्किन हायजीन टिप्स, जाणून घेऊया पाय धुण्यामागची वैज्ञानिक कारणं
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement