advertisement

10 दिवसांच्या लेकराला छातीशी कवटाळून आई पोहोचली 12 वीच्या परीक्षेला, काळजाला भिडणारी मराठी तरुणीची कहाणी

Last Updated:

बाळंतपणाच्या जखमा ओल्या, पण शिक्षणाची ओढ अफाट! १० दिवसांच्या बाळाला छातीशी कवटाळून आई पोहोचली 12 वीच्या पेपरला; नांदेडमधील काळजाला भिडणारी तरुणीची कहाणी

News18
News18
बाळंतपणानंतर स्त्रीला प्रचंड काळजी घ्यावी लागते, एक छोटी चूक तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. शरीर एकदम लहक झालेलं असतं, वेदना, मानसिक ताण, बाळंपणानंतर आलेला थकवा या सगळ्या गोष्टी होत्या. धड उभं राहायलाही त्रास होत असताना नांदेडमध्ये एका २१ वर्षांच्या तरुणीनं जे केलंय, ते पाहून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
अंगात बाळंतपणाची कळ आहे, शरीराला विश्रांतीची ओढ आहे, पण डोळ्यांत भविष्याचं स्वप्न घेऊन ही 'शक्ती' चक्क बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरी जात आहे. शीतल चंद्रकांत चित्ते असं या धाडसी तरुणीचं नाव आहे.
पोराला छातीशी कवटाळून पोहोचली पेपरला
शीतलने अवघ्या १० दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बारावीची परीक्षा असल्याने ती डगमगली नाही. तिने पोराला छातीशी कवटाळलं, तिने आराम करण्याऐवजी जिद्दीनं परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी हजर झाली.
advertisement
विशेष म्हणजे, इंग्रजीच्या पहिल्या पेपरच्या वेळी तर बाळाचा जन्म होऊन अवघे दोनच दिवस झाले होते! टाके ओले असताना, वेदना होत असतानाही शीतलने इंग्रजीचा पेपर लिहिला आणि बुधवारी राज्यशास्त्राच्या पेपरला ती आपल्या १० दिवसांच्या तान्ह्या लेकाला घेऊनच पोहोचली.
आई पेपर लिहितेय अन् बाळ झोपी गेलं
नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधील ते दृश्य पाहून अनेकांचा कंठ दाटून आला. शीतल जेव्हा बाळाला घेऊन आली, तेव्हा कॉलेज प्रशासनानेही माणुसकीचं दाखवलं. "ही मुलगी एवढ्या कष्टाने येतेय, तर आपण तिच्यासाठी काय करू शकतो?" असा विचार करून प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर आणि त्यांच्या टीमने तातडीने तिथे एक 'मातृस्नेह कक्ष' तयार केला. तिथे बाळासाठी पाळणा लावला. आता शीतल तिथे शांतपणे पेपर लिहित होती आणि तिचं बाळ पाळण्यात होतं.
advertisement
अधिकाऱ्यांच्या डोळ्यांतही आलं पाणी
शीतलचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालंय. तिचा पती कामानिमित्त दिवसभर बाहेर असतो. घरी बाळाला सांभाळायला कोणीही नाही. अशा वेळी "बाळ लहान आहे, पुढच्या वर्षी परीक्षा देऊ" असं म्हणणं सोपं होतं. पण शीतल म्हणाली, "हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
हे शिक्षणच मला आणि माझ्या बाळाला उभं करेल." तिच्या या निर्णयाला सासरच्या आणि माहेरच्या माणसांनीही साथ दिली. शिक्षण अधिकारी माधव साळगर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा केंद्राला भेट दिली, तेव्हा शीतलची जिद्द पाहून तेही थक्क झाले. "आम्ही अनेक विद्यार्थी पाहिले, पण अशी जिद्द कधीच पाहिली नाही," अशा शब्दांत त्यांनी शीतलचं कौतुक केलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
10 दिवसांच्या लेकराला छातीशी कवटाळून आई पोहोचली 12 वीच्या परीक्षेला, काळजाला भिडणारी मराठी तरुणीची कहाणी
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement