advertisement

उलटी गिनती सुरू! 23 फेब्रुवारीला ठीक 7:27 मिनिटांनी घडणार काही तरी मोठं, 'या' राशींवर येणार संकट

Last Updated:
23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू आणि सूर्य आधीच कुंभ राशीत आहेत, त्यामुळे हे संक्रमण सामान्य मानले जात नाही.
1/7
23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू आणि सूर्य आधीच कुंभ राशीत आहेत, त्यामुळे हे संक्रमण सामान्य मानले जात नाही. मंगळ आणि राहूचा संयोग हा एक शक्तिशाली ज्योतिषीय संयोग मानला जातो, ज्यामुळे अनेक लोकांच्या स्वभावात आणि परिस्थितीत अचानक बदल होऊ शकतात.

2/7
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:27 मिनिटांनी शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच राहू आणि सूर्य विराजमान असल्याने, मंगळाच्या या प्रवेशामुळे तिथे एक अत्यंत स्फोटक आणि प्रतिकूल स्थिती निर्माण होणार आहे.

3/7
मंगळ आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले जातात. जेव्हा शनीच्या राशीत मंगळाचे आगमन होते, तेव्हा त्याला 'दुहेरी चाल' किंवा संघर्षाचा काळ म्हटले जाते. या काळात निर्माण होणारा 'अंगारक योग' विशेषतः या तीन राशींच्या जातकांसाठी मोठ्या अडचणी घेऊन येऊ शकतो.

4/7
मंगळ हा अग्नी तत्त्वाचा आणि साहसाचा ग्रह आहे, तर कुंभ ही वायू तत्त्वाची रास आहे. जेव्हा आग आणि वारा एकत्र येतात, तेव्हा परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते. या काळात लोकांमध्ये राग, चिडचिडेपणा आणि घाई वाढते. राहू आणि मंगळाची युती लोकांच्या बुद्धीवर परिणाम करते, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता असते. या संक्रमणामुळे आर्थिक फटका बसण्यासोबतच आरोग्याच्या तक्रारीही वाढू शकतात.

5/7
सिंह - नात्यात दुरावा आणि वाद: सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण सातव्या भावात होणार आहे. जोडीदारासोबत किंवा व्यवसायातील भागीदारासोबत तीव्र मतभेद होऊ शकतात. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण करू शकतो. शांत राहणे हाच मोठा उपाय आहे.

6/7
कुंभ - आरोग्य आणि अपघाताची भीती: स्वतः कुंभ राशीतच ही युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी काळ कठीण आहे. तुमच्या स्वभावात आक्रमकता येईल. वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, कारण अपघाताचे योग आहेत. डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.

7/7
मीन - आर्थिक नुकसान आणि वाढता खर्च: मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ बाराव्या भावात प्रवेश करत आहे. अनपेक्षित खर्च समोर येतील, ज्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल. शत्रू तुमच्या विरोधात कट रचू शकतात, त्यामुळे आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement