Jal neti : जलनेतीमुळे होते श्वसनप्रक्रियेत सुधारणा, डोकेदुखी होईल कमी, रोगप्रतिकारक शक्तीही राहिल चांगली
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं, जल नेती करण्याचे फायदे सांगितले आहेत. ही एक प्राचीन आणि सोपी योगिक पद्धत आहे. या आवश्यक योगिक शुद्धीकरण पद्धतीमुळे, अनुनासिक मार्ग खोलवर स्वच्छ करणं शक्य होतं आणि श्वसन आरोग्य सुधारतं.
मुंबई : चांगली हवा मिळावी यासाठी बाहेर पडत असाल तर थांबा कारण घराबाहेर फ्रेश हवा मिळेल याची खात्री आता देता येत नाही.
सकाळी आपण घराबाहेर पडताच, धूर, धूळ आणि विषारी हवा आपल्या श्वासासोबत आपल्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे नाक बंद होणं, वारंवार शिंका येणं, सायनसमधे वेदना होणं, डोकं जड होणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं असा त्रास जाणवू शकतो. यावर उपाय म्हणून, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं, जल नेती करण्याचे फायदे सांगितले आहेत. ही एक प्राचीन आणि सोपी योगिक पद्धत आहे. या आवश्यक योगिक शुद्धीकरण पद्धतीमुळे, अनुनासिक मार्ग खोलवर स्वच्छ करणं शक्य होतं आणि श्वसन आरोग्य सुधारतं.
advertisement
जल नेती ही शतकानुशतकं चालत आलेली एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित सरावामुळे स्वच्छ आणि सुरळीत श्वास घेण्यास मदत होते, ज्यामुळे ते विशेषतः प्रदूषित शहरांमधे राहणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं.
जल नेतीमधे नेती पॉट हे विशेष भांडं वापरलं जातं. या पॉटच्या मदतीनं, कोमट मिठाच्या पाण्यानं नाकाचे मार्ग स्वच्छ केले जातात. या पद्धतीमुळे नाकातून धूळ, प्रदूषणाचे कण, अॅलर्जी आणि अतिरिक्त श्लेष्मा बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे नाकातील मार्ग उघडतात आणि श्वसनाचे कार्य सुधारतं.
advertisement
जल नेती कशी करावी?
प्रथम, पाय थोडे वेगळे ठेवून बसा. शरीर थोडं पुढे झुकवा. डोकं नाकपुडीच्या विरुद्ध दिशेनं वाका, जिथे श्वास घेणं सोपं आहे. नेटी पॉटचा नळी एका नाकपुडीत ठेवा. तोंड थोडं उघडा आणि तोंडातून श्वास घ्या आणि बाहेर काढा.
हळूहळू पाणी आत ओता, एका नाकपुडीतून आत जाऊ द्या आणि दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडू द्या. जेव्हा अर्ध भांडं रिकामं असेल तेव्हा नाक साफ करा आणि दुसऱ्या बाजूनंही हीच प्रक्रिया पुन्हा करा. शेवटी, उरलेले पाण्याचे थेंब काढून टाकण्यासाठी कपालभाती प्राणायाम करा.
advertisement
जलनेती करताना घ्यायची खबरदारी:
पाणी कोमट असावं, खूप गरम किंवा खूप थंड नसावं. एक लीटर पाण्यात सुमारे अर्धा चमचा मीठ मिसळा. पहिल्यांदाच योग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जलनेती करा. नाकाचा गंभीर संसर्ग किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर जलनेती करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जलनेतीचे उपयोग -
नाक आणि सायनसची खोलवर स्वच्छता: जलनेतीमुळे धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरिया बाहेर काढला जातो, ज्यामुळे सायनुसायटिस आणि ऍलर्जीपासून आराम मिळतो.
advertisement
सर्दी आणि नाक बंद होण्यापासून आराम मिळतो. जलनेती नियमित केल्यानं नाक बंद होणं, शिंका येणं आणि श्लेष्म कमी होतो.
श्वसनसंस्था मजबूत होते - दमा आणि वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गासाठी देखील जलनेती फायदेशीर मानली जाते, कारण यामुळे वायुमार्ग स्वच्छ राहतो.
advertisement
डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम: नाक उघडल्यानं डोक्यात जडपणा जाणवण्याचं प्रमाण कमी होतं आणि वेदना कमी होतात.
मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता: जलनेतीमुळे ऑक्सिजन प्रवाह सुधारतो, ज्यामुळे मन अधिक सक्रिय आणि शांत होते. यामुळे ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.
जलनेती ही एक सोपी, स्वस्त आणि नैसर्गिक पद्धत आहे जी घरी सहजपणे अवलंबता येते. आयुष मंत्रालयानंही विशेषतः प्रदूषित वातावरणात राहणाऱ्यांसाठी, जलनेती करण्याची शिफारस केली आहे. योग्य पद्धतीनं आणि काळजीपूर्वक नियमितपणे जलनेती केली तर, श्वास स्वच्छ करत नाही तर मानसिक स्पष्टता आणि एकूण आरोग्य देखील सुधारू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jal neti : जलनेतीमुळे होते श्वसनप्रक्रियेत सुधारणा, डोकेदुखी होईल कमी, रोगप्रतिकारक शक्तीही राहिल चांगली








