22 किमी मायलेज, दमदार फिचर्ससह येतेय नवी बजेट कार; किंमतही असणार कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
Renault Kwid चं फेसलिफ्ट मॉडेलची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. Renault Kwid फेसलिफ्ट मॉडेलची अलीकडे चाचणी सुरू झाली आहे.
भारतात सध्या कारच्या किंमतीत चांगलीच कपात झााली आहे. जीएसटीमध्ये दर कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत चांगलीच कपात झाली आहे. अशातच भारतात Renault मोटर्सने सगळ्यात स्वस्त अशी TRIBER ही ७ सीटर एमपीव्ही आणून मार्केटमध्ये आपलाा दबदबा कायम राखला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून Renault स्वस्तात मस्त अशा कार आणल्या आहेत. आता पुन्हा एकदा Renault आपली Renault Kwid चं स्वस्तात मस्त असं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या Renault Kwid ची किंमत ही सगळ्यात कमी म्हणजेच ४ लाखांपासून सुरू होणार, अशी माहिती आाहे.
Renault Kwid चं फेसलिफ्ट मॉडेलची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. Renault Kwid फेसलिफ्ट मॉडेलची अलीकडे चाचणी सुरू झाली आहे. नवीन Renault Kwid चा लूक हा रेनॉच्या काइगर SUV साारखाच असणार आहे. Renault Kwid मध्ये समोर स्लीम LED लाईट्स आणि नवीन स्टायलिश ग्रील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. Renault Kwid च्या मागील बाजूला रेनॉचा नवीन लोगो आणि बदललेल्या टेल लाईट्स असेल. आधीच्या Renault Kwid पेक्षा नवीन Renault Kwid ही वेगळी असणार आहे.
advertisement
Renault Kwid च्या केबिनमध्येही काही बदल पाहायला मिळणार आहे. केबिन फ्रेश आणि आरामदायी वाटण्यासाठी नवीन सीटचे कापड आणि रंग बदलं जाऊ शकतं. तसंच, आधीपेक्षा मोठा टचस्क्रीन दिला जाण्याची शक्यता आहे. एवढं नाहीतर नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिलं जाईल. तसंच कारमध्ये रिअर पार्किंग सेन्सर्स, पुढच्या पॉवर विंडो आणि क्रूझ कंट्रोलसारखे महत्त्वाचे फिचर्स कायम असणार आहे.
advertisement

Renault Kwid च्या इंजिनमध्ये फार असा काही बदल केला जाणार नाही, अशी चिन्ह आहे. नवीन Renault Kwid मध्ये तेच 1.0 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 68 bhp ची पॉवर जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय असेल. तसंच, Renault Kwid ही CNG व्हेरियंटमध्ये सुद्धा उपलब्ध असेल.
advertisement
22 किमी मायलेज
Renault Kwid च्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर सध्यााची Renault Kwid ही १.० लिटर इंजिनवर जवळपास २१ ते २२ किमी इतकं मायलेज देते. नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये यामध्ये थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायलेज जास्त मिळू शकतं.
किंमत 4 लाखांपासून
Renault Kwid ही एक छोट्या साईजची कार असणार आहे. या नव्या Renault Kwid च्या फेसलिफ्टची किंमत अंदाजे 4.30 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन Renault Kwid ही 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. Renault Kwid ची स्पर्धा मारुती सुझुकीच्या अल्टो Maruti Suzuki Alto शी असणार आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:45 PM IST







