Post Officeच्या RD स्किममध्ये दरमहा करा 3500रुपये जमा! पाहा 5 वर्षात किती मिळेल रिटर्न
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्किम अंतर्गत तुम्हाला लोनची सुविधाही मिळते. अकाउंट किमान एक वर्षे चालू राहिल्याने आणि अकाउंटमध्ये 12 महिने सलग पैसे जमा केल्यानंतर तुम्ही लोनसाठी पात्र होता.
Post Office RD Calculator: पोस्ट ऑफिसदेशातील नागरिकांना अनेक प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय प्रदान करते. पोस्ट ऑफिसमध्ये सामान्य बचत खात्यांऐवजी आवर्ती ठेव खाते, पीपीएफ, किसान विकास पत्र, टीडी खाते, एमआयएस यासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात. येथे आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी अकाउंटविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
पोस्ट ऑफिस आपल्या आरडी अकाउंटवर 6.7 टक्क्यांचं वार्षिक व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्किममध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह बचत करु शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही लिमिट नाही. म्हणजेच तुम्ही यामध्ये हवे तितके पैसे जमा करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्याजवळ पोस्ट ऑफिसचं सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे.
advertisement
आरडी खात्यावर कर्ज सुविधा उपलब्ध : पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत, तुम्हाला कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. खाते किमान एक वर्ष चालू राहिल्यानंतर आणि तुम्ही 12 महिने नियमित ठेवी ठेवल्यानंतर तुम्ही कर्जासाठी पात्र ठरता. पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या आरडी खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेच्या 50 टक्के पर्यंत कर्ज म्हणून घेऊ शकता, जे एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करता येते.
advertisement
पोस्ट ऑफिसची ही आरडी स्किम 5 वर्षे म्हणजेच 60 महिन्यात मॅच्योर होते. खरंतर तुम्ही ही पुढील 5 वर्षांसाठीही वाढवू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्किममध्ये दरमहा 3500 रुपेय जमा केले तर 60 महिन्यानंतर मॅच्योरिटीवर तुम्हाला एकूण 2,49,776 रुपये मिळतील. यामध्ये तुम्ही जमा केलेली रक्कम 2,10,000 रुपये असतील. तर त्यावरील व्याज हे 39,776 रुपये असेल.






