कुटुंबाच्या आनंदासाठी 9 कोटींचं टेन्शन ठेवलं बाजूला! भाचीच्या लग्नात राजपाल यादवचा भाईजानच्या गाण्यावर डान्स, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rajpal Yadav Niece Wedding Dance Video : तणावाच्या वातावरणातही राजपालने कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. भाचीच्या लग्नात तो मनमुराद डान्स करताना दिसला आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाऊंसिंग प्रकरणात 11 दिवस तिहार जेलमध्ये होता. नुकतीच त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. जेलमधून बाहेर येताच राजपाल यादव भाचीच्या लग्नात पोहोचला आहे. 9 कोटींच्या प्रकरणामुळे तो चर्चेत असताना, टीका होत असताना या सगळ्या तणावाच्या वातावरणातही राजपालने कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. भाचीच्या लग्नात तो मनमुराद डान्स करताना दिसला आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजपाल यादवच्या भाचीच लग्न सध्या मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी सोहळ्यात संपूर्ण कुटुंबाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. याच मेहंदी सोहळ्यात राजपालने पत्नी आणि इतर कुटुंबीयांसोबत डान्स केला. राजपालने बायकोबरोबर सलमान खानच्या गाण्यावर ठेका धरला.
advertisement
राजपाल यादवने ‘तेरी चुनरिया’ या फेमस गाण्यावर धमाल डान्स केला. Hello Brother या सिनेमातील सलमान खानचं हे गाणंआजही लग्नसमारंभांमध्ये तितकंच लोकप्रिय आहे. न्यायालयीन प्रक्रियेचं टेन्शन असतानाही राजपाल यादवने कुटुंबासाठी आनंदाचे क्षण जपले. मेहंदी सोहळ्यात तो पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसला. पत्नीचा हात धरून केलेला त्याचा डान्स आणि कुटुंबीयांसोबतचे हास्यविनोद करत तो व्यक्त झाला.
advertisement
सोशल मीडियावर या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजपाल यादवचा हा हसरा चेहरा पुन्हा पाहायला मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 9 कोटींचं टेन्शन काही काळासाठी बाजूला ठेवून त्याने भाचीच्या लग्नात दाखवलेला आनंदी चेहरा सगळ्यांना भावुक करून गेला.
advertisement
राजपाल यादवने जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. 9 कोटींपैकी 1.5 कोटी रुपये कोर्टाच जमा केल्यानंतर राजपाल यादवला जेलमधून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1.5 कोटींबरोबरच त्याने त्याचा पासपोर्टही कोर्टात जमा केला आहे.
इतकंच नाही तर बाहेर आल्यानंतर त्याने इंडस्ट्रीला आवाहन केलं आहे की त्याला कामाची गरज आहे. तुम्ही मला कितीही पैसे द्या, पण मला काम द्या. मला काम करायची इच्छा असल्याचं राजपाल यादवने सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कुटुंबाच्या आनंदासाठी 9 कोटींचं टेन्शन ठेवलं बाजूला! भाचीच्या लग्नात राजपाल यादवचा भाईजानच्या गाण्यावर डान्स, VIDEO









