Success Story : कमी शेती असली म्हणून काय झालं! टोमॅटो शेतीतून शेतकऱ्याने कमावले 2 लाख नफा!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रगतशील शेतकरी किशोर गोरे यांनी टोमॅटो शेतीतून यंदाही यशस्वी वाटचाल केली आहे. 20 गुंठे क्षेत्रात वीरांग या वाणाची लागवड केली असून या क्षेत्रात सुमारे तीन हजार टोमॅटोची झाडे उभी आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील प्रगतशील शेतकरी किशोर गोरे यांनी टोमॅटो शेतीतून यंदाही यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनाचा अनुभव असलेल्या गोरे यांनी ऑक्टोबर महिन्यात 20 गुंठे क्षेत्रात वीरांग या वाणाची लागवड केली असून या क्षेत्रात सुमारे तीन हजार टोमॅटोची झाडे उभी आहेत.
advertisement
योग्य नियोजन, वेळेवर खत-पाणी व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणामुळे उत्पादन चांगले मिळत आहे. आतापर्यंत या शेतीतून त्यांना सव्वा एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच पुढील काही आठवड्यांत आणखी सुमारे 50 हजार रुपयांची भर पडेल, आणि एकूण 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
advertisement
टोमॅटो लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतामध्ये बेड केले, ठिबक सिंचन पाईप टाकला आणि त्यावर मल्चिंग पेपर वापरण्यात आला. त्यानंतर टोमॅटोची लागवड केली. मिश्र खत वापरले आणि 10-26-26 याचा देखील वापर केला. तसेच बुरशीनाशक, कीटकनाशकची फवारणी केली. या शेतीसाठी एकरी एक लाख रुपयांचा खर्च येतो त्यामुळे 20 गुंठे क्षेत्रासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला असल्याचे देखील गोरे यांनी सांगितले.
advertisement
advertisement







