advertisement

Obesity : भारतात लठ्ठपणाला 'दुर्धर' आजार म्हणून जाहीर करावं, देशभरातल्या तज्ज्ञांचा सल्ला, लठ्ठपणामुळे वाढतंय गंभीर विकारांचं प्रमाण

Last Updated:

1990 ते 2022 दरम्यान मुलं आणि किशोरवयीन मुलांमधे 5-19 वर्ष या वयोगटामधे लठ्ठपणाचं प्रमाण चिंताजनक वाढलं आहे. अहवालानुसार, जागतिक स्तरावर ते 1.9 टक्क्यांवरून 8.2 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. या काळात, मुलींमधे हे प्रमाण 0.1 टक्क्यांवरून 3.1 टक्क्यांपर्यंत आणि मुलांसाठी 0.2 टक्क्यांवरून 3.7 टक्क्यांपर्यंत वाढलंय.

News18
News18
मुंबई : निरोगी आणि सकस अन्नाऐवजी प्रोसेस्ड फूडचा वाढता वापर, बैठी जीवनशैली आणि शहरीकरणामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललंय. 2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतात लठ्ठपणा हा एक मोठा सार्वजनिक आरोग्य आव्हान बनत चाललंय आणि शरीराच्या दृष्टीनं हा दर चिंताजनक आहे.
देशाच्या आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञांच्या अलीकडचे अहवाल पाहिले तर ही बाब समजून येते. कारण ज्यांच्याकडे भावी नागरिक म्हणून पाहिलं जातंय त्या पिढीमधेच लठ्ठपणाचं प्रमाण वेगानं वाढतंय. 1990 ते 2022 दरम्यान मुलं आणि किशोरवयीन मुलांमधे 5-19 वर्ष या वयोगटामधे लठ्ठपणाचं प्रमाण चिंताजनक वाढलं आहे. अहवालानुसार, जागतिक स्तरावर ते 1.9 टक्क्यांवरून 8.2 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. या काळात, मुलींमधे हे प्रमाण 0.1 टक्क्यांवरून 3.1 टक्क्यांपर्यंत आणि मुलांसाठी 0.2 टक्क्यांवरून 3.7 टक्क्यांपर्यंत वाढलंय.
advertisement
1.25 कोटी मुलं आणि किशोरवयीन मुलांमधे लठ्ठपणा आढळतो आणि जगभरातील लठ्ठ प्रौढांमधे भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे असं इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ओबेसिटीमधे प्रकाशित झालेल्या अलिकडच्या अहवालात म्हटलंय. गेल्या 3-4 दशकांमधे भारतात लठ्ठपणाचं प्रमाण वाढणं चिंताजनक आहे आणि त्यासाठी लठ्ठपणा व्यवस्थापनात मोठे बदल आवश्यक आहेत असं अहवालात म्हटलं आहे.
advertisement
भारतात, लठ्ठपणा हा एक जुनाट आणि गुंतागुंतीचा आजार नसून केवळ जीवनशैलीची समस्या मानला जातो,  यावर प्रभावी उपचार करणं शक्य आहे. जागतिक स्तरावर, लठ्ठपणा हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो कारण यामुळे हृदयरोग, मधुमेह असे विकार उद्भवू शकतात.
भारतात, त्याच्याशी संबंधित गैरसमजांमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतात आणि उपचारांना विलंब होतो. हा अहवाल एम्स, दिल्ली; ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू; फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम; आणि जोतिदेव डायबिटीज रिसर्च सेंटर, त्रिवेंद्रम, केरळ इथल्या तज्ज्ञांनी तयार केला आहे.
advertisement
लठ्ठपणामधे, आपल्याला प्रथम त्याचं व्यवस्थापन आणि प्रतिबंध करणं आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, आपल्याला संभाव्य गुंतागुंत टाळण्याची आवश्यकता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मधे असं म्हटलंय की, लठ्ठपणा चिंताजनक दरानं वाढत आहे आणि आज भारतातलं ते एक मोठं सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाणं हे त्यामागचं मोठं कारण आहे.
advertisement
याशिवाय, बैठी जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांचा देखील समावेश आहे, सर्वेक्षणात अस्वास्थ्यकर अन्नावर भारी कर लादण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण त्यामुळे असंसर्गजन्य रोग (NCDs) (मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब) होण्याचा धोका वाढत आहे.
अस्वास्थ्यकर आहार, बैठी जीवनशैलीसह जीवनशैलीतील बदल, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPF) चा वाढता वापर आणि पर्यावरणीय घटकांमुळे, लठ्ठपणा हा सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करत आहे आणि यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांचा धोका त्यामुळे वाढतो आहे. ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही लोकसंख्येवर परिणाम होत आहे.
advertisement
लठ्ठपणाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढण्याचा अंदाज आहे. 2050 पर्यंत, भारतातील अंदाजे 17.4 टक्के महिला आणि 12.1 टक्के पुरुष लठ्ठ असतील. 2060 पर्यंत, जास्त वजन आणि लठ्ठपणाचा खर्च 72 ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लठ्ठपणाचे धोके ओळखून त्यादृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Obesity : भारतात लठ्ठपणाला 'दुर्धर' आजार म्हणून जाहीर करावं, देशभरातल्या तज्ज्ञांचा सल्ला, लठ्ठपणामुळे वाढतंय गंभीर विकारांचं प्रमाण
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement