advertisement

‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, जालन्यात नेमकं काय घडलं?

Last Updated:

छत्रपती शिवरायांच्या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र तो योग्य ठिकाणी खर्च होत नसल्याची खंत व्यक्त करत जालन्यात शिवप्रेमींनी भीक मागे आंदोलन केले. 

+
भीक

भीक मागो

जालना : संपूर्ण राज्यात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु, जालन्यात मात्र शिवप्रेमींना भीक मागण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवरायांच्या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र तो योग्य ठिकाणी खर्च होत नसल्याची खंत व्यक्त करत जालन्यात शिवप्रेमींनी भीक मागे आंदोलन केले.
जालना शहरात भव्य असा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. परिसरात छान असे उद्यान आहे. या उद्यानाकडे केवळ शिवजयंती आली तरच लक्ष दिले जाते. रंगरंगोटी केली जाते. अन्य दिवसांत साधी स्वच्छता देखील केली जात नाही. उद्यानात बसवलेले कारंजे चोरी जातात.
advertisement
उद्यानाच्या बाजूने झालेले काम देखील दर्जाहीन झाले आहे. त्यामुळे आम्ही भीक मागून निधी गोळा करायचे ठरवले आहे. आम्हाला गरिबातील गरीब व्यक्तीने देखील पैसे दिलेत. हे पैसे आम्ही प्रशासनाला देऊ आणि या पैशातून महाराजांसाठी चांगले काम करवून घेऊ असे आंदोलक किरण देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असताना जालन्यात मात्र शिवप्रेमींना असे आंदोलन करायची वेळ आल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/जालना/
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, जालन्यात नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement