advertisement

Watch : Analog की Digital कोणतं घड्याळ जास्त अचूक? नेहमीच्या धावपळीसाठी कोणतं आहे Best

Last Updated:
बाजारात आज दोन प्रकारची घड्याळं राज्य करत आहेत. एक पारंपरिक 'Analog' आणि दुसरं आधुनिक 'Digital'. अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की कोणतं घड्याळ जास्त अचूक असतं? चला तर मग, या दोन्ही घड्याळांच्या तंत्रज्ञानाचा 'काटा' काढूया आणि सत्य जाणून घेऊया.
1/8
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकाच गोष्टीच्या मागे धावत असतो, ती म्हणजे 'वेळ'. लोकल ट्रेन पकडणं असो, ऑफिसचं लॉगिन असो किंवा मुलांची शाळा; पाच मिनिटांचा उशीरही अख्ख्या दिवसाचं नियोजन कोलमडवून टाकतो. अशा वेळी आपण वारंवार आपल्या हातावरच्या घड्याळाकडे पाहतो. पण, कधी तुमच्या मनात हा विचार आला आहे का की, तुमचं घड्याळ तुम्हाला 'शंभर टक्के' खरी वेळ दाखवतंय का?

2/8
बाजारात आज दोन प्रकारची घड्याळं राज्य करत आहेत. एक पारंपरिक 'अॅनालॉग'  आणि दुसरं आधुनिक 'डिजिटल'. अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की कोणतं घड्याळ जास्त अचूक असतं? चला तर मग, या दोन्ही घड्याळांच्या तंत्रज्ञानाचा 'काटा' काढूया आणि सत्य जाणून घेऊया.

3/8
1. काट्याचं घड्याळ : केवळ स्टाईल की अचूकता?अॅनालॉग घड्याळात तास, मिनिट आणि सेकंदाचे काटे असतात. ही घड्याळं मुख्यत्वे दोन प्रकारे चालतात:
मेकॅनिकल (Mechanical): ही जुन्या पद्धतीची घड्याळं स्प्रिंग आणि गिअरवर चालतात. तापमान किंवा हाताच्या हालचालींमुळे यात रोज काही सेकंदांचा फरक पडू शकतो. त्यामुळे ही घड्याळं शंभर टक्के अचूक नसतात.
1. काट्याचं घड्याळ : केवळ स्टाईल की अचूकता?अॅनालॉग घड्याळात तास, मिनिट आणि सेकंदाचे काटे असतात. ही घड्याळं मुख्यत्वे दोन प्रकारे चालतात:मेकॅनिकल (Mechanical): ही जुन्या पद्धतीची घड्याळं स्प्रिंग आणि गिअरवर चालतात. तापमान किंवा हाताच्या हालचालींमुळे यात रोज काही सेकंदांचा फरक पडू शकतो. त्यामुळे ही घड्याळं शंभर टक्के अचूक नसतात.
advertisement
4/8
क्वार्टझ (Quartz): आजकालची बहुतेक काट्याची घड्याळं 'क्वार्टझ' तंत्रज्ञानावर चालतात. यात एक छोटा बॅटरी सेल आणि क्वार्टझ क्रिस्टल असतो. बॅटरीच्या ऊर्जेमुळे हा क्रिस्टल एका ठराविक गतीने कंपन पावतो, ज्यामुळे वेळ खूप स्थिर आणि अचूक राहते.

5/8
2. डिजिटल घड्याळ : आकड्यांचा खेळडिजिटल घड्याळात वेळ थेट अंकात दिसते. ही घड्याळं प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक असतात. यामध्येही क्वार्टझ तंत्रज्ञानाचाच वापर केला जातो, पण वेळ दाखवण्यासाठी काट्यांऐवजी LCD किंवा LED स्क्रीनचा वापर होतो.
डिजिटल घड्याळात अलार्म, स्टॉपवॉच, बॅकलाइट आणि टाइमर यांसारख्या जास्तीच्या सोयी मिळतात, ज्या धावपळीच्या आयुष्यात खूप कामाला येतात.
2. डिजिटल घड्याळ : आकड्यांचा खेळडिजिटल घड्याळात वेळ थेट अंकात दिसते. ही घड्याळं प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक असतात. यामध्येही क्वार्टझ तंत्रज्ञानाचाच वापर केला जातो, पण वेळ दाखवण्यासाठी काट्यांऐवजी LCD किंवा LED स्क्रीनचा वापर होतो.डिजिटल घड्याळात अलार्म, स्टॉपवॉच, बॅकलाइट आणि टाइमर यांसारख्या जास्तीच्या सोयी मिळतात, ज्या धावपळीच्या आयुष्यात खूप कामाला येतात.
advertisement
6/8
3. मग सर्वात 'परफेक्ट' वेळ कोणतं घड्याळ देतं?विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, घड्याळ अॅनालॉग आहे की डिजिटल यापेक्षा त्यामध्ये 'तंत्रज्ञान' कोणतं आहे, हे महत्त्वाचं असतं.
जर दोन्ही घड्याळं 'क्वार्टझ' आधारित असतील, तर दोघांची अचूकता सारखीच असते. महिनाभरात केवळ 5-10 सेकंदांचा फरक पडू शकतो.
पण, जर आपण 'स्मार्ट वॉच' किंवा 'जीपीएस' आधारित डिजिटल घड्याळांचा विचार केला, तर ती जगातील सर्वात अचूक वेळ दाखवतात. कारण ती सॅटेलाइट किंवा इंटरनेटद्वारे वेळ आपोआप अपडेट (Sync) करून घेतात.
3. मग सर्वात 'परफेक्ट' वेळ कोणतं घड्याळ देतं?विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, घड्याळ अॅनालॉग आहे की डिजिटल यापेक्षा त्यामध्ये 'तंत्रज्ञान' कोणतं आहे, हे महत्त्वाचं असतं.जर दोन्ही घड्याळं 'क्वार्टझ' आधारित असतील, तर दोघांची अचूकता सारखीच असते. महिनाभरात केवळ 5-10 सेकंदांचा फरक पडू शकतो.पण, जर आपण 'स्मार्ट वॉच' किंवा 'जीपीएस' आधारित डिजिटल घड्याळांचा विचार केला, तर ती जगातील सर्वात अचूक वेळ दाखवतात. कारण ती सॅटेलाइट किंवा इंटरनेटद्वारे वेळ आपोआप अपडेट (Sync) करून घेतात.
advertisement
7/8
4. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी कोणतं घ्यावं?जर तुम्हाला सेकंदा-सेकंदाचा हिशोब हवा असेल आणि कामाचा वेग जास्त असेल, तर डिजिटल किंवा जीपीएस आधारित घड्याळ तुमच्यासाठी उत्तम आहे. पण, जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रोफेशनली दिसायचं असेल आणि वेळेचं ढोबळ नियोजन पुरेसं असेल, तर क्वार्टझ अॅनालॉग घड्याळही तितकंच विश्वासार्ह आहे.

8/8
थोडक्यात सांगायचे तर घड्याळ कोणतंही निवडा, पण त्यात 'क्वार्टझ' तंत्रज्ञान असल्याची खात्री करा. शेवटी घड्याळ कितीही महागडं आणि अचूक असलं, तरी वेळेचं नियोजन करणं हे तुमच्याच हातात आहे.
थोडक्यात सांगायचे तर घड्याळ कोणतंही निवडा, पण त्यात 'क्वार्टझ' तंत्रज्ञान असल्याची खात्री करा. शेवटी घड्याळ कितीही महागडं आणि अचूक असलं, तरी वेळेचं नियोजन करणं हे तुमच्याच हातात आहे.
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement