Tata आता करणार मोठा धमाका, आता पेट्रोल भरण्याचं टेन्शन दूर; आणतेय नवी EV SUV; रेंज...
- Published by:Sachin S
Last Updated:
Tata Punch EV अखेरीस आपल्या नवीन लूक आणि फिचर्ससह लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनीपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. एकीकडे सेफ्टी आणि मजबूत अशा एसयूव्ही लाँच केल्या आहे तर दुसरीकडे इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही एकापेक्षा एक कार आणि एसयूव्ही लाँच केल्यात. अलीकडेच टाटाने Tata Punch फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं होतं. त्यानंतर आता Tata Punch EV Facelift मॉडेल लाँच करणार आहे. २० फेब्रुवारी रोजी हे मॉडेल लाँच होणार आहे. नव्या Tata Punch EV मध्ये पहिल्यापेक्षा जास्त रेंज मिळणार आहे.
Tata Punch EV अखेरीस आपल्या नवीन लूक आणि फिचर्ससह लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. नवीन Tata Punch EV मध्ये 25kWh आणि 35kWh अशा दोन बॅटरीचा पर्याय आहे. पण आता अपडेटेड मॉडेलमध्ये आता 25kWh हा छोटा पॅक बाजूला केला जाईल. आता त्या जागी 35kWh हा बेस व्हेरिएंट असणार आहे. सोबतच नव्या Tata Punch EV मध्ये आता एक नवीन बॅटरी पॅक मिळणार आहे. ज्यामुळे गाडीची रेंजही वाढणार आहे.
advertisement
40kWh आणि 45kWh बॅटरी पॅक मिळणार?
नवीन Tata Punch EV मध्ये आता Nexon EV सारखीच 45kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. कारची साईज आणि किंमतीचा बॅलेन्स राखण्यासाठी टाटा मोटर्स आता Tata Punch EV मध्ये आधी वापरलेली 40.5kWh बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या टिझरमध्ये नव्या Tata Punch EV एकदा चार्ज केल्यावर 593.6 किमी इतकी रेंज देईल असे संकेत दिले होते.
advertisement
डिझाईनमध्येही बदल
नव्या Tata Punch EV च्या डिझाइनमध्येही बदल केले जाणार आहे. समोरील भागामध्ये बदल केले जातील. LED डे-टाइम रनिंग लाइट आता मधल्या भागात लावले जातील. या शिवाय नवीन बंपर आणि वेगळा दिसणारा हेडलॅम्प दिला जाईल. ज्यामुळे कारचा लूक आणखी वेगळा वाटेल. तसंच कारच्या मागील भागात ICE Punch फेसलिफ्ट सारखे कनेक्टेड टेललॅम्प मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
केबिनमध्ये होतील बदल
Tata Punch EV च्या बाहेरीलच नाहीतर आतमध्ये सुद्धा बदल केल्याचे पाहण्यास मिळणार आहे. नव्या Tata Punch EV मध्ये डिजिटल ड्राइव्हर डिस्प्ले, नवी इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग व्हील डिझाइन, फिजिटल कंट्रोल्स आणि चांगले सीट दिले जाातील.
किती असणार आहे किंमत?
नव्या Tata Punch EV ची किंमत किती असेल याबद्दल बरीच उत्सुकता आहे. नव्या Tata Punch EV ची किंमत 9.99 लाख ते 14.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असण्याची शक्यता आहे. Tata Punch EV च्या फेसलिफ्टमध्ये नवीन बॅटरी दिली जाणार आहे, त्यामुळे किंमत वाढण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 6:08 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Tata आता करणार मोठा धमाका, आता पेट्रोल भरण्याचं टेन्शन दूर; आणतेय नवी EV SUV; रेंज...










