Summer Tips : उन्हाळ्यात काकडी खाताना तुम्ही 'ही' चूक करत नाही ना? फायदे सोडाच उलट पोटाला होईल त्रास!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
काकडीतील पाणी पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे चरबी जळण्यास मदत होते. पण हीच काकडी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खाल्ली तर ती तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
मुंबई : उन्हाळयात काकडी खाण्याचं प्रमाण वाढतं. कारण काकडी रसाळ आणि शरीराला गारवा देणारी फळभाजी आहे. काकडी खाल्ल्याने उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. कारण काकडीमध्ये मुबलक पाणी असतं आणि ते शरीराला हायड्रेट करतं. पण उन्हाळयात काकडी खाताना काही साध्या साध्या चूल टाळल्या पाहिजेत. नाहीतर काकडीचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
नोएडा येथील 'डाएट मंत्रा क्लिनिक'च्या संस्थापक आणि आहारतज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज18 ला सांगितलं की, उन्हाळ्यात घामामुळे शरीरातलं बरंच पाणी कमी होतं. यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. पण काकडीमध्ये मुबलक पाणी असतं. काकडी नियमित खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकून राहतं आणि उष्माघातापासूनही बचाव होतो. काकडी नैसर्गिकरित्या आपलं शरीर थंड ठेवते.
advertisement
आहारतज्ञांच्या मते, तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचा असेल तर तुम्ही काकडी खायला हवी. कारण त्यात कॅलरीज कमी आणि फायबर भरपूर असते. काकडी खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्ही अनावश्यक खाणं टाळता. काकडीतील पाणी पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे चरबी जळण्यास मदत होते. पण हीच काकडी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खाल्ली तर ती तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
advertisement
काकडी खाताना या चुका टाळा..
- सर्वात पाहिलं तर रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात काकडी खाणं बंद करा. रिकाम्या पोटी जास्त काकडी खाल्ल्यानं काही लोकांना पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा वेदना जाणवू शकतात. काकडीचे गुणधर्म थंड असल्यामुळे आणि तिच्यात जास्त पाणी असल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
- दुसरं म्हणजे रात्रीच्यावेळी काकडी खाणं. रात्री काकडी खाल्ल्याने रात्री शरीराची पचनसंस्था मंदावते. कारण रात्री वातावरण काही प्रमाणात थंड असतं आणि काकडीचे गुणधर्मही थंड असतात. म्हणूनच रात्रीच्यावेळी काकडी खाल्ल्याने गॅस, अपचन किंवा पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात.
advertisement
- कधीकधी नकळत किंवा घाईगडबडीत ही चूक होऊ शकते. पण शक्यतो काकडी न धुता खाऊ नका. काकडी न धुता खाल्ल्याने शरीरात जीवाणू, घाण आणि रसायनं प्रवेश करू शकतात. यामुळे संसर्ग किंवा पोटाच्या समस्या होऊ शकतात.
- जास्त प्रमाणात काकडी खाणंही शरीरासाठी चांगलं नाही. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास वारंवार लघवी होणे, इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन आणि अशक्तपणा येऊ शकतो.
advertisement
- काही लोक बाजारातून काकडी आणली ती फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर तशीच काढून ती खातात. पण अशी थंड काकडी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. थंड काकडी खाल्ल्याने घसा खवखवणे, सर्दी किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात. म्हणून काकडी नेहमी सामान्य तापमानावर आल्यावरच खावी.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात काकडी खाताना तुम्ही 'ही' चूक करत नाही ना? फायदे सोडाच उलट पोटाला होईल त्रास!









