advertisement

पिंपरी चिंचवडकरांनो, लक्ष द्या! मिरवणुकीमुळे या मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्गांची यादी

Last Updated:

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. हे बदल आज रविवारी दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीसाठी लागू असतील.

आळंदी-मोशीत आज जड वाहनांना नो-एन्ट्री (प्रतिकात्मक फोटो)
आळंदी-मोशीत आज जड वाहनांना नो-एन्ट्री (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी चिंचवड : श्री क्षेत्र आळंदीमध्ये सकल हिंदू समाज आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने रविवारी (५ एप्रिल) भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान आळंदी आणि मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. हे बदल आज रविवारी दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीसाठी लागू असतील.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
आळंदी फाटा (चाकण) कडून प्रवेश बंदी: चाकण बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने मोशीतील भारतमाता चौक मार्गे डावीकडे वळून, देहूफाटा चौकातून उजवीकडे वळून जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक आणि भोसरी-मॅगझीन चौक मार्गे पुढे जातील.
advertisement
चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी: चाकण चौक (आळंदी) येथून इंद्रायणी हॉस्पिटल चौक मार्गे चाकणकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहने बोपदेव चौक, चिंबळी फाटा आणि पुणे-नाशिक महामार्गाचा वापर करू शकतील.
याव्यतिरिक्त जड वाहनांना जोग धर्मशाळा, चाळीस फुटी चौक, वडगाव रस्ता आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरून वळवण्यात आले आहे. प्रशासनाने वाहनचालकांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवडकरांनो, लक्ष द्या! मिरवणुकीमुळे या मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्गांची यादी
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement