Baramati ByElection: सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन, जय पवारही अॅक्शन मोडवर ! तरीही १९ जण बारामतीच्या मैदानात, पाहा यादी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Baramati Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचे चित्र आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत जवळपास १९ उमेदवार रिंगणात आहेत. तर, काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सत्ताधारी महायुतीची इच्छा होती. सुनेत्रा पवार यांनीदेखील शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचे चित्र आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत जवळपास १९ उमेदवार रिंगणात आहेत. तर, काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उद्या, ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यांच्या अर्जापूर्वीच तब्बल १९ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी बारामतीचा नवा आमदार कोण, याचा फैसला होणार आहे.
सुनेत्रा पवारांचा फोन ....
advertisement
राष्ट्रवादीच्या उमेदवार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शनिवारी, मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या आवाहनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
काँग्रेस उमेदवार देणार?
अजित पवारांच्या निधनानंतर सहानभूतीच्या लाटेवर ही निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आवाहनही केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही इच्छुकांच्या मुलाखती झाल्याची माहिती आहे.
जय पवार अॅक्शन मोडवर...
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आगामी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बारामतीमध्ये जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण बारामतीकरांनी आधीच कौल ठरवला असून बारामतीमध्ये विकास काम दिसत आहेत, ती दादांमुळे असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
>> बारामतीच्या पोटनिवडणुकीत कोण आहे रिंगणात?
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
संदीप खरात ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष, बारामती )
अनिल तुपे ( अपक्ष )
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )
दादा थोरात ( अपक्ष, बारामती )
अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )
advertisement
सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी ( अपक्ष )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )
रजाक मुलाणी ( अपक्ष )
सागर भिसे ( अपक्ष )
advertisement
सागर भिसे ( अपक्ष )
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 11:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati ByElection: सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन, जय पवारही अॅक्शन मोडवर ! तरीही १९ जण बारामतीच्या मैदानात, पाहा यादी








