advertisement

लग्नाच्या वरातीत रक्ताचा सडा, तरुणाने काका अन् भावाचा केला खून, वर्ध्यातील भयंकर घटना!

Last Updated:

वर्धा शहरात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या सख्ख्या काकाची आणि चुलत भावाची निर्घृण हत्या केली आहे.

वर्ध्यात तरुणाकडून काका अन् चुलत भावाची हत्या
वर्ध्यात तरुणाकडून काका अन् चुलत भावाची हत्या
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या सख्ख्या काकाची आणि चुलत भावाची निर्घृण हत्या केली आहे. लग्नाची वरात सुरू असतानाच तरुणाने हा खुनी हल्ला केला. त्याने बेसावध असलेल्या चुलत भावावर आणि काकांवर चाकुने सपासप वार केले. काकांनी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हल्लेखोराला पकडलं. मात्र ते स्वत:चा आणि आपल्या मुलाचा जीव वाचवू शकले नाहीत. लग्नाच्या वरातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे असं मयत पावलेल्या बापलेकाची नावं आहेत. हल्लेखोर आरोपी हा अल्पवयीन आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री भलमे यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं. याच लग्नात हल्लेखोराने काका प्रभाकर आणि चुलत भाऊ नितीन यांना संपवण्याचा कट रचला. लग्नाची वरात सुरू असतानाच त्याने हा खुनी खेळ केला.

नेमकं प्रकरण काय?

advertisement
शनिवारी रात्री भलमे यांच्या नातेवाईकाचं लग्न होतं. नवरदेव बोहल्यावर चढला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. बँड वाजत होता. वऱ्हाडी नाचत होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं. जेव्हा ही वरात हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात जात होती. त्याच वेळी संपत्तीच्या वादातून पुतण्याने काका आणी चुलत भावावर चाकू हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बरबडी येथील रहिवासी असलेल्या भलमे कुटुंबीयांचे संपतीच्या वादातून आपसात खटके उडत होते. आठ महिन्यापूर्वी सुद्धा अल्पवयीन आरोपी आणि मृतकांमध्ये वाद झाला होता. आरोपी हा त्यांना मारण्याच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होता. त्याने दोघांना मारण्यासाठी चाकू सुद्धा ऑनलाईन मागवला होता. शनिवारी रात्री नातेवाईकाचं वर्धेत लग्न होतं. या लग्नात त्याने काका आणी चुलत भावाला मारण्याचा कट रचला. वरात ही वाजत गाजत हनुमान मंदिरात पोहचताच पुतण्याने काका आणी भावावर चाकु हल्ला करत जखमी केले. या हल्ल्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी तातडीने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.
advertisement
एकीकडे लग्नाचा आनंदसोहळा सुरू असताना अचानक झालेल्या चाकुहल्ल्याच्या घटनेनं आनंदात विजरन पडलं. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलीस तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत तातडीने कारवाई केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाच्या वरातीत रक्ताचा सडा, तरुणाने काका अन् भावाचा केला खून, वर्ध्यातील भयंकर घटना!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement