advertisement

Shocking Incident : फळ विक्रेत्यासमोरच काळाचा घाला! 65 वर्षीय वृद्धासोबत माटुंग्यात जे घडलं, त्याने परिसर सुन्न

Last Updated:

Matunga Accident : घरातील सदस्यांसाठी फळ खरेदी करताना एका वृद्ध व्यक्तीसोबत भयंकर प्रकार घडलेला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून नेमकं काय घडलं त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

माटुंगा येथे भरधाव कारच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू
माटुंगा येथे भरधाव कारच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील माटुंगा परिसरात शुक्रवारी सकाळी एक दुर्देवी अपघात घडला आहे, ज्यामुळे एका निरपराध वयोरुद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागला. रस्त्याच्या कडेला केळी खरेदी करत उभ्या असलेल्या 65 वर्षीय सोहराभ रुसी कोतवाल यांना भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.
ही घटना सकाळी साधारण साडेकरा वाजण्याच्या सुमारास चंदावरकर मार्गावर घडली. अपघातावेळी प्रत्यक्ष हजर असलेल्यांच्या मते कार अतिवेगात होती आणि त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. धडकी इतकी भीषण होती की कोतवाल यांचा यात जागीत मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की यात एका व्यक्ती जीव गेलाच मात्र एक टॅक्सी, हातगाडी, बाईक आणि अजून एका वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरमी पोलिसांनी कारचालक रामकृष्णन सूर्यनारायण याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : फळ विक्रेत्यासमोरच काळाचा घाला! 65 वर्षीय वृद्धासोबत माटुंग्यात जे घडलं, त्याने परिसर सुन्न
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement