'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त सनरुफ कार! किंमत फक्त 6.99 लाख रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cheapest Sunroof Cars in India: आपली स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशावेळी प्रत्येकाला भरपूर फीचर्स असलेली कार हवी असते. सध्या सनरुफ असलेली कार सर्वांनाच हवी असते. आज आपण सर्वात स्वस्व सनरुफ कारविषयी जाणून घेणार आहोत.
Tata Punch: ही मायक्रो एसयूव्ही सेगमेंटची प्रसिद्ध चॉइस आहे. Pure+ S ट्रिमने सिंगल-पेन सनरूफ मिळतो. या कारची सुरुवातीची किंमत 7.34 लाख (एक्स शोरुम) आहे.1.2L पेट्रोल (88hp) किंवा CNG ऑप्शनसह ही MT/AMT गियरबॉक्समध्ये येते. 5-स्टार सेफ्टी रेटिंग, मजबूत बिल्ड आणि हाय ग्राउंड क्लियरेंससह ही शहर आणि हायवे दोन्हीवर परफेक्ट आहे.

या कारच्या टॉप Accomplished+ S व्हेरिएंटमध्ये120 hp टर्बो पेट्रोल इंजन आणि सनरूफ 9.79 लाख रुपयांमध्ये मिळतं. सोबतच ही कार व्हॉइस असिस्टेड सनरूफ , 10.25-इंच स्क्रीन, 360° कॅमेरासारख्या फीचर्ससह येते. ही कार फॅमिलीसाठी स्पेसियस आणि सेफ आणि तरुणांसाठी स्टायलिश आहे. Punch सनरूफसह व्हॅल्यू फॉर मनी ठरते.
advertisement

Hyundai i20: ही कार सध्या भारतातील सर्वात स्वस्त सनरूफ कार आहे. Magna ट्रिमने सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ मिळतं. ज्याची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत फक्त 6.99 लाख रुपये आहे. 1.2L पेट्रोल इंजिन(83hp) सह MT आणि CVT ऑप्शन उपलब्ध आहे. प्रीमियम हॅचबॅक फील, चांगला स्पेस आणि फीचर्ससह ही रोजच्या ड्रायव्हिंगला स्पेशल बनवते. ज्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करू शकता.
advertisement

i20 मध्ये व्हॉइस कमांडने सनरूफ कंट्रोलही मिळतो. N Line व्हेरिएंटमध्ये 120 hp टर्बो इंजिनसह किंमत 9.22 लाख रुपयांपासून सुरू होते. फीचर्समध्ये 6 एयरबॅग्स, मोठा टचस्क्रीन आणि प्रीमियम इंटीरियरसह फॅमिली आणि तरुण दोन्हींसाठी आकर्षक ऑप्शन आहे. स्टायलिश लूक आणि चांगलं मायलेज कारला बजेट सेगमेंटमध्ये बेस्ट ऑप्शन बनवतो.
advertisement

Kia Sonet: ही स्टायलिश सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या कारच्या HTE(O) ट्रिममध्ये सिंगल-पेन सनरूफ मिळतो आणि सुरुवातीची किंमत 7.70 लाख रुपये आहे. 1.2 लिटर पेट्रोल किंवा 1.5 लिटर इंजिनसह MT/AT ऑप्शन मिळतात. प्रीमियम लूक, चांगले फीचर्स आणि ड्रायव्हिंग एक्सपीरियन्ससही ही तरुण खरेदीदारांची फेव्हरेट आहे.
advertisement

सोनेट ही सध्याच्या काळात सर्वात स्वस्त डिझेल-ऑटोमेटिक सनरूफ कार आहे. याची किंमत 9.77 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल उपलब्ध आहे. 8-इंच टचस्क्रीन, चांगले सेफ्टी फीचर्स आणि बोल्ड डिझाइनसह ही सेगमेंटमध्ये प्रीमियम फील देते. सनरूफसह ओपन-एयर ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी ही चांगली एसयूव्ही आहे.
advertisement

Tata Altroz: ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे. जी सनरूफ Pure S ट्रिम वरुन ऑफर करते. या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 7.36 लाख रुपये आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, सीएनजी किंवा 1.5L डिझेल इंजिनसह MT/AMT/DCT ऑप्शन मिळतात. व्हॉइस-असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफसह ही कार 5-स्टार सेफ्टी आणि शानदार राइड क्वालिटीसाठी ओळखली जाते.
advertisement

या कारची Creative S डिझेल व्हेरिएंट 9.32 लाख रुपयांत सनरूफसह येते आणि ही सर्वात स्वस्त डिझेल इंजिनसह येणारी सनरूफ कार आहे. प्रीमियम इंटीरियर, चांगला स्पेस आणि मल्टीपल इंजिन चॉइससह Altroz फॅमिली वापरासाठी बेस्ट आहे. मजबूत बिल्ड आणि फीचर्स या कारला 10 लाख रुपयांच्या आतची टॉप कंटेंडर बनवते.

Hyundai Exter: ही मायक्रो-एसयूव्ही आहे. जी 2026 फेसलिफ्टनंतर HX4+ ट्रिममध्ये सनरूफ ऑफर करते. सनरूफसह याची किंमत 8.06 लाख रुपयांपासून सुरू होते. 1.2 लिटर पेट्रोल (83 hp) किंवा सीएनजीसह MT/AMT ऑप्शन मिळतो. कॉम्पॅक्ट साइज, हाय ग्राउंड क्लियरेन्स आणि मॉडर्न फीचर्ससह शहरातील ड्रायव्हिंगसाठी ही आयडियल आहे.

हुंडई एक्सटरमध्ये सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफसह वायरलेस चार्जर, रियर AC व्हेंट्ससारखे फीचर्स मिळतात. स्टायलिश डिझाइन आणि चांगल्या मायलेजसह बजेटमध्ये प्रीमियम एसयूव्ही एक्सपीरियन्स देते. फॅमिली आणि फर्स्ट-टाइम बायर्स दोन्हीसाठी हा शानदार ऑप्शन आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 11:37 AM IST








