advertisement

Success Story : तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई

Last Updated:

बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अपेक्षित नोकरी न मिळाल्याने निराश न होता, अतुल घोडके या तरुणाने आपल्या शेतीत आधुनिक प्रयोग करून अवघ्या 2 एकरातून 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्याची किमया साधली आहे.

+
News18

News18

सोलापूर : आजच्या काळात सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेत असताना, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथील एका तरुण शेतकऱ्याने मात्र वेगळी वाट निवडली आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अपेक्षित नोकरी न मिळाल्याने निराश न होता, अतुल घोडके या तरुणाने आपल्या शेतीत आधुनिक प्रयोग करून अवघ्या 2 एकरातून 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्याची किमया साधली आहे. या संदर्भात अधिक माहिती अतुल घोडके यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
अतुल घोडके यांनी पारंपरिक पिकांच्या मागे न लागता बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. सध्या बाजारात कलिंगडाला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यांनी 07 डिसेंबर 2025 रोजी दोन एकर क्षेत्रात सिंबा या जातीच्या कलिंगडाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कलिंगडची लागवड योग्य प्रकारे करून घेतली.तसेच कलिंगडवर भुरी,करपा, बोकड्या हा रोग होऊ नये,यासाठी दोन दिवसाला फवारणी करून  पिकाचे योग्य व्यवस्थापन केलं. सिंबा जातीच्या कलिंगड लागवडीसाठी अतुल यांना 2 लाख रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर लागवडीचा खर्च वजा करून 65 दिवसात 5 लाखांचा नफा मिळाला असल्याची माहिती अतुलने दिली.
advertisement
पदवी घेऊनही नोकरीसाठी वणवण करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात मेहनत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती नक्कीच परवडते, असा आत्मविश्वास अतुल यांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात कलिंगडला 25 ते 30 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. योग्य पिकाची निवड करून नियोजन, जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर मातीतूनही सोनं पिकवता येतं, हेच अतुल यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement