भाजपचा माणूस काँग्रेसबरोबर, ९ नगरसेवकही सोबत, भिवंडीत महापौर कसा बसवणार? सपकाळांनी गणित सांगितलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bhiwandi Mayor Election: सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट बनविल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले
ठाणे (भिवंडी) : भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली आणि सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिंदेसेनेसोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे, त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
टिळक भवन येथे खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाचा त्याग करुन सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. आज त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपाचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेस प्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे सपकाळ म्हणाले.
advertisement
भिवंडीत काँग्रेसचा महापौर कसा बसवणार? सपकाळांनी गणित सांगितलं
"मागील २४ दिवसात इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली, आता कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) १२ व भाजप सोडून आलेले नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल", असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
advertisement
भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार बाळ्यामामा म्हात्रे यावेळी म्हणाले की, "भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेक्युलर फ्रटंची स्थापन करून सत्ता स्थापन्याचा प्रयत्न मागील २४ दिवसापासून सुरु होता. समाजवादी पक्षाशी चर्चा केली पण त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थानपनेचा मार्ग मोकळा झाला आहे".
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 4:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचा माणूस काँग्रेसबरोबर, ९ नगरसेवकही सोबत, भिवंडीत महापौर कसा बसवणार? सपकाळांनी गणित सांगितलं









