गूगलने भारतात लॉन्च केला पिक्सेल 10A, किंमत 49,999; पाहा कधी सुरु होतेय विक्री
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
गूगलने भारतात आपला नवीन स्मार्टफोन पिक्सेल 10A लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा फोकस या फोनच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फीचर्सला जास्तीत जास्त यूझर्सपर्यंत पोहोचवणे आहे.
advertisement
पिक्सल 10A चा सेल 6 मार्च 2026 पासून सुरु होईल. मात्र प्री ऑर्डर आजपासून सुरु आहे. गूगल इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मितुल शाह यांनी म्हटले की, पिक्सल 10ए कमी किंमतीत प्रीमियम फीचर्सचा दमदार पॅकेज आहे आणि याला विशेषतः भारतीय यूझर्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. कंपनीला आशा आहे की, हा फोन भारतात पिक्सेल ब्रांडची उपलब्धता आणखी मजबूत करेल.
advertisement
पिक्सेल 10ए मध्ये डिस्प्ले, बॅटरी आणि एआय फीचर्ससह अनेक प्रमुख अपग्रेड्स आहेत. हा फोन दैनंदिन वापरासाठी आणि उच्च कामगिरीसाठी डिझाइन केला आहे. यात 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे ज्याची ब्राइटनेस 3,000 निट्स पर्यंत आहे. याचा अर्थ असा की स्क्रीन तेजस्वी सूर्यप्रकाशातही स्पष्ट आणि चमकदार दिसेल. गुगलचा दावा आहे की ही आतापर्यंतची सर्वात तेजस्वी पिक्सेल ए सीरीज स्क्रीन आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लॉन्च ऑफर्स आणि सोपे हप्ते : गूगलने पिक्सेल 10A वर अनेक ऑफर्स दिल्या आहेत. जेणेकरुन ग्राहक हे सहज खरेदी करु शकतील. एचडीएफसी बँक कार्डवर 3,000 रुपयांची सूट मिळेल. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस दिलं जाईल. ग्राहक 24 महिन्यापर्यंत कोणत्याही व्याजाशिवाय ईएमआयचा पर्यायही निवडू शकतात. याव्यतिरिक्त गूगल पिक्सेल अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत 2,083 रुपये महिन्याच्या हप्त्यावर फोन खरेदी केला जाऊ शकतो.
advertisement






