बॉसची 'सिक्रेट' केबिन, मिळायचे 90 लाख; चार वर्षे शांतपणे चालला खेळ, एका चुकीमुळे शेवटी सर्व उघड पडले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
The scam: अमेरिकेत भारतीय वंशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत मित्रासोबत मिळून कंपनीला सुमारे 10 कोटी रुपयांचा फटका दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बनावट बायोडेटा आणि खोटी नियुक्तीच्या आधारे चार वर्षे हा घोटाळा सुरू होता.
मुंबई : अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने कॉर्पोरेट जगतातील फसवणुकीचे असे उदाहरण घडवले आहे की, ते ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. युनायटेडहेल्थ ग्रुपची उपकंपनी ‘ऑप्टम’मध्ये सीनियर डायरेक्टर पदावर कार्यरत असलेल्या करण गुप्ता यांनी आपल्या पदाचा उपयोग कंपनीच्या प्रगतीसाठी न करता, स्वतःच्या फायद्यासाठी केला. आपल्या जिवलग मित्रासोबत संगनमत करून त्यांनी कंपनीच्या तिजोरीलाच मोठी खीळ घातली.
करण गुप्ता यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून बनावट बायोडेटाच्या आधारे आपल्या मित्राला कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळवून दिली. डेटा इंजिनिअरिंगसारख्या महत्त्वाच्या विभागात त्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्याला डेटा विषयाची प्राथमिक माहितीही नव्हती. गुप्ता यांनी स्वतःच त्याचा बनावट अनुभव आणि पात्रता दाखवणारा बायोडेटा तयार केला. मित्राला नोकरी मिळाली, त्याला सुरुवातीला एक लाख डॉलरहून अधिक म्हणजे सध्याच्या एक्सचेंज दरानुसार सुमारे 90 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. विशेष म्हणजे त्याचा थेट वरिष्ठ अधिकारीही स्वतः करण गुप्ता होते.
advertisement
यानंतर सुरू झाला खरा ‘खेळ’. नियुक्त झालेला मित्र ना ऑफिसला येत होता, ना कोणतेही प्रत्यक्ष काम करत होता. चार वर्षांच्या कालावधीत त्याने कंपनीसाठी एक साधा ईमेलदेखील पाठवला नाही, इतकेच नव्हे तर अनेक आठवडे तो संगणकात लॉगिनही करत नव्हता. तरीदेखील त्याला नियमितपणे पगार आणि बोनस मिळत राहिले. या संपूर्ण काळात त्याच्या पगारातील जवळपास अर्धी रक्कम तो गुपचूप गुप्ता यांना परत देत होता. वेतन वाढले तसे ‘कमिशन’ची रक्कमही वाढत गेली.
advertisement
ही फसवणूक 2015 मध्ये सुरू झाली होती. पुढील काही वर्षांत कंपनीला तब्बल 1.2 मिलियन डॉलर, म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपयांचा फटका बसला. कंपनीला वाटत होते की त्यांचा डेटा अॅनालिटिक्स विभाग उत्तम कामगिरी करत आहे; प्रत्यक्षात मात्र तिथे ‘डॉलर अॅनालिटिक्स’चा खेळ सुरू होता.
नोव्हेंबर 2019 मध्ये करण गुप्ता एका वेगळ्या प्रकरणात कंपनीच्या रडारवर आले आणि त्यांना नोकरीतून काढण्यात आले. त्यानंतर कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली आणि हळूहळू या मोठ्या गैरव्यवहाराचे थर उलगडत गेले. एफबीआयने (FBI) तपास केल्यानंतर स्पष्ट झाले की ज्या पदावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, तिथून प्रत्यक्षात शून्य काम झाले होते.
advertisement
सहा दिवस चाललेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर करण गुप्ता यांना फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या कटात दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 8:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बॉसची 'सिक्रेट' केबिन, मिळायचे 90 लाख; चार वर्षे शांतपणे चालला खेळ, एका चुकीमुळे शेवटी सर्व उघड पडले









