advertisement

Baramati: आधी चौकात फिरला, मग मृत्यूला कवटाळलं! धावत्या टेम्पोखाली स्वतःला झोकून दिलं; बारामतीचा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Last Updated:

मोरगाव चौकात वाहतूक सुरळीत सुरू असतानाच एका अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

Baramati Video
Baramati Video
पुणे :  बारामती तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे गजबजलेल्या असलेल्या मोरगाव चौकात वाहतूक सुरळीत सुरू असतानाच एका अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सदर इसम काही काळापासून चौक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसत होता. तो कधी रस्त्याच्या कडेला उभा राहत, तर कधी वाहनांच्या हालचालींकडे एकटक पाहत होता. त्याच्या वागण्यातून तो अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. दरम्यान, चौकातून जाणारा आयशर टेम्पो हळूहळू पुढे जात असताना अचानक त्या इसमाने क्षणाचाही विलंब न करता टेम्पोच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकून दिले. ही घटना इतकी अचानक घडली की उपस्थित नागरिकांना काही कळण्याच्या आतच सर्व काही घडून गेले.
advertisement

टेम्पो चालकाने तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न

टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जोरदार धडकेमुळे इसम गंभीर जखमी झाला आणि काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चौकात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
advertisement

मोरगाव चौक परिसरात शोककळा

या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो कोण आहे, कुठून आला आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, नागरिकांनी ओळख पटविण्यास मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या हृदयद्रावक घटनेने मोरगाव चौक परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Baramati: आधी चौकात फिरला, मग मृत्यूला कवटाळलं! धावत्या टेम्पोखाली स्वतःला झोकून दिलं; बारामतीचा काळजाचा ठोका चुकवणारा Video
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement