advertisement

Special Report: ठाकरेंची शिंदेंशी 'राज'कीय भेट, बैठकीच्या चर्चेत काय ठरलं?

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 20:39 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्याच वर्षी ठाकरे बंधूंची युती झाली. महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या. त्यात दोन्ही भावांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. पण महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले. यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.यावर आता विरोधकांनी तोंडसूख घेतले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: ठाकरेंची शिंदेंशी 'राज'कीय भेट, बैठकीच्या चर्चेत काय ठरलं?
advertisement
advertisement
advertisement