राणेंना प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले,
'भाजप 288 जागा लढणार' या भाजप नेते नारायण राणेंच्या विधानावर भाष्य करताना नरेश म्हस्के म्हणाले, " नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडलेल आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचे मत नाही. हे मत माननीय अमित शहा साहेबांचं नाही. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही. महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे ? " असा सवाल देखील नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.
advertisement
प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजित दादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील." असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर खासदार नरेश म्हस्केंनी दिलं आहे.
महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय?
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी विविध फॉर्म्युल्यांची चर्चा सध्या सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सर्वाधिक जागा लढेल, हे अगदी स्पष्ट आहे. तर पाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते नारायण राणेंचं विधान तात्कालिक असून त्याचा तसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुती पक्षाच्या ताकदीनुसार लढले, असंच चित्र सध्यातरी दिसत आहे.
